Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

Showing posts with label HSC BOARD. Show all posts
Showing posts with label HSC BOARD. Show all posts

MH-GK : General Knowledge for Sainiki Schools in Maharashtra

MH-GK: General Knowledge for Sainiki Schools in Maharashtra
                    महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सैनिकी शाळा स्थापन करण्यात आलेली आहे. या सैनिकी शाळेचे चा उद्देश
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA साठी मुलांची पूर्वतयारी करणे हा आहे. यासाठी त्यांच्या दैनिक अभ्यासक्रमांमध्ये सैनिकी प्रशिक्षण व अकरावी, बारावी साठी जनरल नॉलेज GK म्हणजेच सामान्य ज्ञान हा विषय अभ्यासासाठी ठेवण्यात आलेला आहे. 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे. यांच्या वतीने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी व शिक्षकांसाठी MH-GK : General Knowledge for Sainiki Schools in Maharashtra. या ब्लॉगवर नोट्स, प्रश्नपत्रिका व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा…

                        वास्तविकतः सामान्य ज्ञान हा विषय खूप व्यापक स्वरूपाचा आहे. सध्याच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात सामान्य ज्ञान या विषयास अनन्य साधारण महत्व आहे. एवढेच नव्हे तर व्यक्तिमत्व विकासात व प्रभावी व्यक्तिमत्व विकसित करताना सामान्य ज्ञानाचा आभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुषंगाने सदरील वेबसाईटवर सामान्य ज्ञान या विषयाशी निघडीत साहित्य प्रकाशित करण्यात येते. याचा उपयोग सर्व सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांना होणारच आहे. त्या बरोबरच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA  च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्यानाही होणार आहे. 

११ वी निकाल २०१९ २०

महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्या वतीने इयत्ता ९ वी ते १२ वी विषय योजना व मूल्यमापन योजनेच पुनर्विचार करण्यासाठी सामिती गठीत करण्यात आली होती. या समितीचा शिफारसीनुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने  ९ ऑगस्ट २०१९ रोजी एक परिपत्रक काढण्यात आहे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे कडून दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजी परिपत्रकान्वये
इयत्ता ११ वी साठी शैक्षणिक वर्ष २०१९ २० व इयत्ता १२ वी साठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली. ती खालील प्रमाणे आहे.
·      अंतिम मूल्यमापन हे ६५० ऐवजी ६०० गुणांचे राहील.
·      पर्यावरणशास्त्र या विषयामध्ये 'जल सुरक्षा' हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.पर्यावरणशास्त्र विषयास देण्यात येणाऱ्या ५० गुणांऐवजी प्राप्त गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात आहे आहे.
·      लेखी मूल्यमापनासोवत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट केले आहे.
·      अंतर्गत मूल्यमापन शैक्षणिक वर्षाच्या शेवटी न करता पूर्ण वर्षभरात करण्याची मुभा राहील, या संदर्भातील नियोजन उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर करावयाचे आहे.
·       इ.११वी ची वार्षिक परीक्षा, इ.११वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर व इ.१२वी ची वार्षिक परीक्षा इ.१२वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित राहील. 
·      इ.११वी व इ.१२वी मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन/तोंडी/प्रकल्प/प्रात्यक्षिक/चाचणी मिळून किमान ३५% गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील.  
·      मंडळाच्या प्रचलित निकषाप्रमाणे सवलतीच्या गुणांची तरतूद (Grace Marks System) सुरू राहील तसेच क्रीडाक्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या / सहभागी होणाऱ्या आणि स्काऊट व गाईड मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सवलतीचे अतिरिक्त गुण प्रचलीत निकषाप्रमाणे सुरु राहतील.
·      इ.११वी व इ.१२वी च्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रकारचे किमान २५% प्रश्न असतील.
·      इ.११वी व इ.१२वी करिता मूल्यमापन योजना सोबत जोडलेल्या Annexure-B (एकूण ४ पृष्ठे ) व C (एकूण ५ पृष्ठे ) प्रमाणे राहील.
·      या व्यतिरिक्त शासन निर्देशांप्रमाणे वेळोवेळी होणारे बदल स्वतंत्र परिपत्रकान्वये सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना यथावकाश कळविण्यात येतील.
·      वरील सर्व सूचना आपल्या विभागातील मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक व सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी.


 
इयत्ता ११वी गुणांकन शैक्षणिक वर्ष २०१९ २० पासून पुढे
विषय
गुणांकन
        घटक
                        चाचणी १
                        प्रथम सत्र
घटक चाचणी २
वार्षिक लेखी
प्रात्यक्षिक
/तोंडी/
                एकूण
वार्षिक
निकाल 
(एकूण/२)
इंग्रजीमराठी
हिंदीव    भाषा विषय 
(सर्व शाखा)
२५
२५
५०
८०
२०
२००
१००
पर्यावरण शास्त्र व 
जल सुरक्षा - 
अनिवार्य विषय 
सर्व शाखा



३०
२०
५०
श्रेणी 
 रुपांतर
आरोग्य व शारीरिक शिक्षण
         अनिवार्य विषय सर्व शाखा



२५
२५
५०
श्रेणी
 रुपांतर
विज्ञान शाखा - भौतिकशास्त्ररसायनशास्त्र
                    जीवशास्त्र व प्रात्यक्षिक परीक्षा असलेले विषय
२५
२५
५०
७०
३०
२००
१००
     गणित - विज्ञानकलावाणिज्य 
 व २० 
गुणांची प्रात्यक्षिक 
            परीक्षा असलेले विषय
२५
२५
५०
८०
२०
२००
१००
          कला,  वाणिज्य व २० गुणांची   
प्रात्यक्षिक/ अंतर्गत
 मूल्यमापन परीक्षा
 असलेले विषय
२५
२५
५०
८०
२०
२००
१००
                 एकूण
              वार्षिक निकाल
=
                         इंग्रजी
                                        +
वैकल्पिक विषय ग्रुप  B,C 
मधून ५ विषय
१००
                    +
५००
                  =
600

                                ग्रेड विषयाचे ग्रेड विभागणी -
                            30 व पेक्षा ज्यास्त                            
                        अ श्रेणी
                            २३-२९
                        ब श्रेणी
                            १७-२२
                        क श्रेणी
                        १७ पेक्षा कमी
                        ड श्रेणी























शिक्षण संक्रमण

शिक्षण संक्रमण



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या “शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.




अथवा


Mahateach या संकेतस्थळा च्या शिक्षण संक्रमण या पेजला जावून डायरेक्ट लिंक द्वारे “शिक्षण संक्रमण” चा अंक Download करता येईल.
त्यासाठी खालील लिंकला क्लिक करा-



१० वी १२ वी इ मार्कशीट E Marksheet


१० वी १२ वी इ मार्कशीट

दहावी-बारावीची मार्कलिस्ट किंवा बोर्ड सर्टिफिकेट हारवले व खराब झाले असेल तर अशा वेळी त्याची दुय्यम प्रत मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या कार्यालयात आपल्या शाळेमार्फत अर्ज करावा लागतो. हा अर्ज करण्याची प्रक्रिया  वेळखाऊ व त्रासदायक आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने  इ मार्कशीट संकल्पना पुढे आणली आहे.

त्यासाठी
https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp   या संकेतस्थळावर जाऊन login किंवा नोंदणी करावी लागणार आहे. बोर्डाच्या याच संकेतस्थळावर आपण मार्क्सचे online व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी करू शकतो.

ऑनलाइन मार्कलिस्ट download करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी लागेल:

Online दहावी व बारावी गुणपत्रक download करण्यासाठी
खालील बाबी आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
१.  दहावी व बारावीच्या गुणपत्रिक झेरॉक्स
२.  मोबाइल otp प्राप्त करण्यासाठी
३.  Email Address

कृती:
  1. प्रथम आपल्या संगणकाचे किंवा मोबाईल चे इंटरनेट चालू करा.
  2. कोणतेही वेब ब्राऊजर उदाहरणात google chrome मोझिला फायरफॉक्स इंटरनेट-एक्सप्लोअरर उघडा.
  3. ब्राऊजरच्या ऍड्रेस बार मध्ये  https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp  टाईप करा किंवा गुगल सर्च इंजिनवर जाऊन इ मार्कशीट सर्च करा  त्याखालील आलेल्या पहिल्या लिंकला क्लिक करा. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  4. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची मार्कशीट संकेतस्थळ उघडेल.
  5. या संकेतस्थळाच्या डाव्या बजूला create new account वर क्लिक करा.
  6. यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म online मार्कशीट वेरीफिकेशन वरील माहिती भरा. ही माहिती दहावी किंवा बारावीच्या गुणपत्रिका नुसारच भरावी.
  • गूणपत्रकावरील नाव आहे तसेच भरा.
  • त्यानंतरही कॅटेगरी मध्ये Individual पर्याय निवडा.
  • रजिस्ट्रेशन मध्ये ssc and hsc board हा पर्याय निवडा.
  • त्याखाली आपला चालू मोबाईल नंबर टाका जेणेकरून त्यावर otp प्राप्त होऊ शकेल मात्र हा मोबाईल नंबर यापूर्वी या संकेतस्थळावर वापरण्यात आलेला नसावा.
  • त्याखालील बॉक्समध्ये ई-मेल अड्रेस काळजीपूर्वक भरा आणि रजिस्ट्रेशन नंतर हाच आपला युजर नेम असेल.
  • यानंतर पासवर्ड टाकावा तो संयुक्त स्वरूपामध्ये असला पाहिजे उदाहरणार्थ Admin@123
  • आता पासवर्ड confirm करावा व त्याखाली दिसनारा  व्हेरिफिकेशन कोड टाकावा.
  • I Agree ला क्लिक करावे व त्याखालील Register या बटनावर क्लिक करावे.
  • यानंतर आपले रजिस्ट्रेशन कन्फर्म करण्यासाठी आपल्या मोबाईलवर OTP पाठवण्यात येईल तो टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.


यानंतर verify ssc and hsc marksheet यावर जाऊन युजरनेम म्हणजेच ई-मेल अड्रेस टाकून, पासवर्ड टाकावा व त्याखालील व्हेरिफिकेशन कोड टाकून Login करावे.

लॉगिन झाल्यानंतर:
  1. verify ssc and hsc marksheet यावर जाऊन
  2. येणारी माहिती ssc and hsc marksheet वरून अचूक भरावी
  3. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली येणाऱ्या बटनावर क्लिक केल्यानंतर
  4. PDF File Download होईल.

 इ मार्कशीट आता डीजी लॉकर Digi-locker वरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. डीजी लॉकर Digi-locker संधार्भीय अधिक माहितीसाठी पुढील लिंकला क्लिक करा