Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

कल चाचणी २०१८-१९

कल चाचणी २०१८

कल चाचणी २०१८ विषयीचे माहिती देणारी PPT PDF मध्ये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा:



मा. श्री. विनोद तावडे (शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य) यांच्या उद्यमशील नेतृत्वाने, महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभागाने कल चाचणी हा उपक्रम २०१६ पासून सुरु केला आहे. देशात प्रथमच ५ क्षेत्रीय कल चाचणी राज्य शिक्षण मंडळाच्या इ.१० वी च्या १५.४७ लाख विद्यार्थ्यांसाठी घेतली गेली. 
श्यामची आई फाऊंडेशन ने (SAF), मानसशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने ७ क्षेत्रीय कल चाचणी नव्याने विकसित केली. राज्य शिक्षण मंडळाच्या इ.१० वी च्या बहि:स्थ विद्यार्थ्यांसह शैक्षणिक वर्ष २०१७ मध्ये जवळपास १७ लाख आणि २०१८ मध्ये १७ लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली.
‘कल चाचणी’ प्रकल्प अधिक प्रभावी होण्यासाठी ‘महाकरिअरमित्र पोर्टल’ (www.mahacareermitra.in) व टेकनिकल हेल्पलाईन’ हे उपक्रम महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संस्था श्यामची आई फाऊंडेशनने (SAF) सीएसआर अंतर्गत राबविले आहेत. 'महाकरिअरमित्र पोर्टल' (www.mahacareermitra.in) याद्वारे महाराष्ट्रातील अति दुर्गम भागातील विद्यार्थीसुद्धा त्यांच्या आवडीचे क्षेत्र आणि उपलब्ध संधी यांची संपूर्ण माहिती पाहू शकतील. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शनात्मक व्हिडीओज् पाहू शकतील. तसेच विविध विषयांवरील लेखही वाचू शकतील.
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून कल चाचणी सह अभिक्षमता चाचणी देखील 'महा करिअर मित्र' या मोबाईल अॅप च्या माध्यमाद्वारे संपूर्ण राज्यात घेण्यात येईल. 'महा करिअर मित्र' हे अॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना कल चाचणी आणि अभिक्षमता चाचणीचा संयुक्त अहवाल याच वेब पोर्टलवर उपलब्ध होईल.
विद्यार्थी महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या जवळपास १९,००० शासन मान्य कॉलेजेसचे ८०,००० हून अधिक शैक्षणिक पर्यायांची माहिती घेवू शकतात. तसेच त्यांच्या आवडीनुसार जवळच्या कॉलेजेसमधील अभ्यासक्रमाचा शोध घेवू शकतात. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला यामुळे स्वतःचे करिअर निवडण्याची समान संधी मिळू शकते.
सर्व संस्था व त्यातील अभ्यासक्रम हे शासन मान्य असून त्यांची माहिती ही शिक्षण विभागाच्या संबंधित खात्या कडून प्राप्त झाली आहे.
अपर मुख्य सचिव (शिक्षण) डॉ. वंदना कृष्णा आणि आयुक्त (शिक्षण) श्री. विशाल सोळंकी यांच्या अनुभवी मार्गदर्शनाने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे.
योग्यवेळी करिअर मार्गदर्शन प्रक्रियेत युवकांना निर्णय घेण्यात मदत व्हावी यासाठी महाकरिअरमित्र दीपस्तंभाप्रमाणे कार्य करीत आहे.
(संधर्भ - महा करियर मित्र संकेतस्थळ)

9th Class Result Maker Software


MahaTeach Excel Software हा इयत्ता ९ वी चा वार्षिक निकाल जलद व अचूकपणे तयार करता यावा यासाठी तयार केला आहे. 


हा Excel Software संगणकावर उघडणे आवश्यक आहे. मोबाईलवर उगडल्यास त्यावर काही मर्यादा येवू शकतात व परिणामी निकाल अचूक होण्यावर मर्यादा येवू शकतात.

हा Excel Software कसा वापरावा:
१. प्रथम Excel Software download करावा.
२. आपल्या संगणकावर Microsoft Office Install असणे गरजेचे आहे. MS Office २०१३ मध्ये हा Excel Software तयार केलेला आहे. त्यामुळे MS Office २०१०, २०१३ किंवा त्यापुढील version मध्ये उघडावा. (यासंबंधी काही अडचण असल्यास Blogger शी संपर्क साधावा)
३. Excel Sheet उघडल्यावर आपल्याला Updates वर click करावे लागेल. 

४. यानंतर आपण Input Data वर जावून Students Name sheet वरील सर्व माहिती अचूक भरावी.
यामध्ये college चे नाव व इतर सर्व माहिती व विद्यार्थी यादी भरावी यामध्ये १०० विद्यार्थी माहिती भारता येवू शकते. ( विध्यार्थी संख्या असल्यास Blogger शी संपर्क साधावा)


५. Sheet No 1,2,3,4,5,6,7,8, वर जावून परीक्षानिहाय गुण भरावेत. इतरत्र कोणताही बदल करू नयेत.
६. माहिती भरून झाल्यास प्रिंट करावा 
७. आपला निकाल तयार असेल.


    



शिक्षण संक्रमण डिसेंबर २०१८

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या “शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत  Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.


शिक्षण संक्रमण डिसेंबर २०१८



शिक्षण संक्रमण  डिसेंबर २०१८