नमस्कार,
या blog चा Blogger हा महाराष्ट्रातील एका खाजगी कनिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे.
आधुनिक जग विज्ञान आणि तंत्रज्ञाने नटलेले जग आहे. शिक्षक म्हणून कार्य करत असताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. हि आवाहने पूर्ण करत असताना शिक्षकांना अपडेट राहण्याची गरज आहे आणि हाच हेतू समोर ठेवून आम्ही हा ब्लॉग तयार करत आहोत, जेणेकरून शिक्षकांना सर्वोतोपरी बदलत्या काळानुसार गरजेनुसार मदत करणे शक्य होईल. शिक्षकांना आवश्यक असलेली परिपत्रके, माहिती, शिक्षण व्यस्थेमध्ये होणारे बदल, शासनाची धोरणे, शैक्षणिक अपेक्षा, पालकांच्या अपेक्षा, तसेच विद्यार्थ्यांच्या गरजा संदर्भात महाविद्यालयीन व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना मदत करणे व एकमेकांना जोडणे हे या blog समोरील ध्येय आहे.
इंटरनेटवर विविध शैक्षणिक विषयावर माहितीचे संकलन करत असताना असे आढळून आले की, महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एकमेकाला मदत करण्याच्या भावनेने तसेच आधुनिकतेची कास धरून एकमेकांना साह्य करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे दिसून येते. मात्र त्याबरोबरच असेही निदर्शनास आले की उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय तसेच महाविद्यालयीन शिक्षकांची website किंवा ब्लॉग हे क्वचितच असल्याचे दिसून आले आणि यातूनच या ब्लॉगची संकल्पना समोर आलेली आहे.
हा ब्लॉग 100% परिपूर्ण नसला तो परिपूर्ण बनवणे आपल्या मदतीने निश्चितच शक्य होईल तरी आपाल्य सूचना आम्हाला कळवून या ब्लॉग चा उद्देश पूर्ण करण्यास आपण सहभाग नोंदवावा. आपल्याकडे काही सूचक व महत्वपूर्ण माहिती असल्यास आम्हाला कळवावी ती आम्ही निश्चितच पब्लिश करू.
प्रस्तुत ब्लॉग मधील मते ही blogger ची मते आहेत.
Mr. Dhage SM
Email- sam.dhage2015@gmail.com
Mr.Somnath Dhage