Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

इयत्ता पहिली ते दहावी विषयवार तासिका विभागणी

इयत्ता पहिली ते दहावी विषयवार तासिका विभागणी







महाराष्ट्र शासनाच्या विद्या विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक ०५/१०/२०१७ च्या परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून पहिली ते दहावी करिता विषयवार तासिका विभागणी  बदलण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते आठवी विषयवार तासिका विभागणी बाबत २८ एप्रिल २०१७ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. सदर परिपत्रकातील तासिका विभागणी विभागणीत अंशतः बदल करण्यात येत आहे. सदर परिपत्रक २०१७-१८ पासून लागू करण्यात येत आहे.

इयत्ता १ ली  ते १० वी  विषयवार तासिका विभागणी बदल :

१.    इयत्ता पहिली ते दहावी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी ४५ तासिका ऐवजी ४८ तासिका असेल.
२.    एका वर्गाचा आठवड्याचा एकूण कार्यकाल पूर्वी २६.४५ मिनिटांचा होता. प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर कार्यकाल २७.१० मिनिटे होईल यामुळे एकूण कार्यकालात २५ मिनिटांची वाढ होईल.
३.    दिनांक २८ एप्रिल २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणेच सोमवार ते गुरुवार ८ तासिका असतील. पहिली तासिका ४० मिनिटे व पुढील प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची राहील
४.    सुधारित परिपत्रकानुसार शुक्रवारी ८ तासिका ऐवजी ९ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटाची व पुढील प्रत्येक तासिका ३० मिनिटाची राहील.
५.    शनिवारी ५ तासिका ऐवजी ७ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटाची व पुढील प्रत्येक तासिका ३० मिनिटाची राहील.
६.    सुधारित वेळापत्रकात शुक्रवार व शनिवारच्या तासिका ह्या कला आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयासाठी देण्यात याव्यात.

इयत्ता पहिली ते दहावी विषयवार तासिका विभागणी परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा



ऑफलाईन वेतन बिल


   

ऑफलाईन वेतन बिल

वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकला सादर करावयाचे ऑफलाईन वेतन बिल

शालेय शिक्षण विभागामार्फत महाराष्ट्रातील शिक्षकांचे वेतन करण्यासाठी सन २०१३ पासून “शालार्थ” हे ऑनलाईन संकेतस्थळ चालू करण्यात आले. या प्रणालीमुळे शिक्षकांना वेळेत व अचूकपणे वेतन मिळत होते. मात्र जानेवारी २०१८ पासून काही तांत्रिक अडचणीमुळे हे संकेतस्थळ बंद पडले. माहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०१८ व किंबहुना शालार्य संकेतस्थळ सुरु होईपर्यंत शिक्षकांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने काढण्याचा शासनाने निर्णय घेतला. व तसी कार्यवाही सुरु करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (Pay Unit) यांनी ऑफलाईन बिलासंधार्भीय सूचना संबंधितांना दिल्या व त्यान्वे संबंधित कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

        हे ऑफलाईन बिल सादरीकारानासाठी च्या सूचना वेतन बिलाचे स्वरूप खालीलप्रमाणे असावे असे निर्देशित करण्यात आले आहे. व त्यासोबत जोडावयाची प्रपत्रे – प्रपत्र अ ब प्रपत्र ग यांची Softcopy pdf व  EXCEL Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.      
 

DescriptionDownload link
 देयक सादरीकरण क्रम  Download
 प्रपत्र ग  Download
 प्रपत्र अ ब   Download
Excel Soft Copy  Download

शिक्षण संक्रमण

शिक्षण संक्रमण



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या “शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.




अथवा


Mahateach या संकेतस्थळा च्या शिक्षण संक्रमण या पेजला जावून डायरेक्ट लिंक द्वारे “शिक्षण संक्रमण” चा अंक Download करता येईल.
त्यासाठी खालील लिंकला क्लिक करा-



RTE 2009 कायदा

शिक्षण हक्क कायदा 2009 (RTE  2009) कायद्याची  मराठी  प्रत   

RTE  2009  Original Act
RTE  2009 English                                         Download
RTE  2011 Rules Marathi                     Download














RTE- 2009 कलामांचे शिर्षके:

कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.            
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.         
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला  हस्तांतरण.                
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.            
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.           
  कलम क्रमांक   १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.              
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.            
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.                   
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.    
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .            
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .             
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी शर्ती.       
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.               
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.           
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.             
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.            
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.       
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.             
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.        
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार.


RTE 2009 कायद्या अंतर्गत येणाऱ्या नियमांची यादी PDF मध्ये Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

DOWNLOAD