महाराष्ट्र शासनाच्या विद्या विकास प्राधिकरण,
महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक ०५/१०/२०१७ च्या परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष २०१७-१८
पासून पहिली ते दहावी करिता विषयवार तासिका विभागणी बदलण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते आठवी विषयवार
तासिका विभागणी बाबत २८ एप्रिल २०१७ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. सदर
परिपत्रकातील तासिका विभागणी विभागणीत अंशतः बदल करण्यात येत आहे. सदर परिपत्रक २०१७-१८
पासून लागू करण्यात येत आहे.
इयत्ता १ ली ते १० वी विषयवार तासिका विभागणी बदल :
१. इयत्ता पहिली ते दहावी
एका आठवड्यातील अध्ययन कालावधी ४५ तासिका ऐवजी ४८ तासिका असेल.
२. एका वर्गाचा आठवड्याचा
एकूण कार्यकाल पूर्वी २६.४५ मिनिटांचा होता. प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर
कार्यकाल २७.१० मिनिटे होईल यामुळे एकूण कार्यकालात २५ मिनिटांची वाढ होईल.
३. दिनांक २८ एप्रिल २०१७
च्या परिपत्रकाप्रमाणेच सोमवार ते गुरुवार ८ तासिका असतील. पहिली तासिका ४० मिनिटे
व पुढील प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची राहील
४. सुधारित परिपत्रकानुसार
शुक्रवारी ८ तासिका ऐवजी ९ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटाची व
पुढील प्रत्येक तासिका ३० मिनिटाची राहील.
५. शनिवारी ५ तासिका ऐवजी ७ तासिका
घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटाची व पुढील प्रत्येक
तासिका ३० मिनिटाची राहील.
६. सुधारित वेळापत्रकात शुक्रवार व
शनिवारच्या तासिका ह्या कला आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयासाठी देण्यात
याव्यात.
इयत्ता पहिली ते दहावी विषयवार तासिका विभागणी परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी
खालील लिंक ला क्लिक करा