Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

Showing posts with label E- Learning. Show all posts
Showing posts with label E- Learning. Show all posts

डिजिलॉकर : DigiLocker/ Digital Locker





डिजिलॉकर : DigiLocker/ Digital Locker हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानावर पडतो. त्यामुळे  डिजिलॉकर  DigiLocker/ Digital Locker म्हणजे काय? त्याचा वापर का व कसा करावा ? या सर्व बाबी आपल्यासमोर येतील. त्यामुळे ही संकल्पना  सविस्तर पाहूया.


डिजिलॉकर च्या वेबसाईट वर जाण्यासाठी पुढील बटनावर क्लीक करा

डिजिलॉकर (DigiLocker) ही एक भारत सरकार द्वारे तयार  एक डिजिटल लॉकर सेवा आहे. ही सेवा फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु झाली. या सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. ही भंडारण जागा (Storage) आधार या सेवेशी जोडलेली आहे.प्रत्येक नागरिकास सदस्यास यात सुमारे १जीबी इतकी जागा मिळते.
 ही जागा, त्या सदस्याचे वैयक्तिक दस्तऐवज, जसे: विद्यापिठ अथवा मॅट्रिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका,स्थायी खाते क्रमांक(पॅन),व्होटर आयडी कार्ड इत्यादी ठेवण्यास वापरण्यात येऊ शकते.याचे संलग्नीकरण वेगवेगळ्या खात्यांशी करण्यात आलेले आहे. त्यानुसार, तेथून थेट त्या सदस्यास आपली वैयक्तिक माहिती प्राप्त करता येते. जसे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन परवाना इत्यादी. अजून ही सेवा पूर्ण ताकतीने सुरु झालेली नाही. एकदा ती तशी झाल्यावर,व शासनाच्या अनेक खात्यांचा डाटा त्याचेशी संलग्न झाल्यावर, सदस्य/नागरिक त्याचेसंबंधी कोणतेही कागदपत्रे थेट संगणकावर/भ्रमणध्वनीवर उतरवून घेऊ शकेल, आपले अनेक दस्तऐवज हे प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही.
यात दुसरी सोय अशीही आहे की, नोकरी इत्यादीसाठी आवेदन करतांना, ज्या कागदपत्रांच्या प्रती द्याव्या लागत होत्या, त्या आता द्याव्या लागणार नाहीत. सदस्य संबंधितांस त्याचे कागदपत्रांचा या संकेतस्थळावरील दुवा उपलब्ध करून देउ शकतो त्यावरून नोकरी देणारी संस्था / व्यक्ति ते थेट पाहू व तपासू शकेल.
याचे संकेतस्थळावर, सदस्यास सदस्यनाव व परवलीचा शब्द याद्वारे सनोंद प्रवेश करता येते.पर्याय म्हणून, विपत्राद्वारे किंवा आधार क्रमांकानुसारही यास पोहोच आहे.
(संधर्भ – विकिपीडिया)


डिजिलॉकर का वापरावे? डिजिलॉकर वापराचे फायदे :
१.   आपण आपल्या इच्छेनुसार कधीही, कोठेही आपली महत्वाची कागदपत्रे पाहू, वापरू, इतरांना डिजिटल स्वरुपात पाठवू शकतो.
२.   ही सुविधा मोफत व सुरक्षित आहे.
३.   कागदमुक्त प्रशासन व डिजिटल भारत चा एक भाग आहे.
४.   एखाद्या विभागाने पारित केलेली कागदपत्रे तत्काळ व इतर कोणत्याही दुव्याशिवाय प्राप्त करता येतात.
५.   एकाच ठिकाणी आधार क्रमांकावर सर्व महत्वाची कागदपत्रे उदा. पॅन कार्ड , आधार कार्ड, वाहन परवाना, वाहन नोंदणी प्रत, दहावी, बारावी गुणपत्रक तसेच बोर्ड प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र असी अनेक कागदपत्रे मूळ व डिजिटल स्वरुपात व इत्तर कागदपत्रे आपण अपलोड करू शकता.    
६.   डिजिलॉकर वर अपलोड केलेली कागदपत्रे आपण डिजिटल स्वाक्षरी माध्यमातून स्वयं साक्षांकित करू शकता.
७.   ही सुविधा संगणकावर तसेच मोबाईल वरही वापरता येते.


 डिजिलॉकर च्या वेबसाईट वर जाण्यासाठी पुढील बटनावर क्लीक करा



डिजिलॉकर मोबाईल वर कसे वापरावे :



१.   प्रथम गूगल प्ले स्टोर्स वर जावून  DigiLocker सर्च करावे. व Download करून install करावे.
२.    Sign Up वर क्लिक करून आपला मोबाईल क्रमांक (आधार लिंक असलेला) टाकावा.
३.   आलेला OTP (One Time Password) verify करावा.
४.   यानंतर आपला
User Name (हा ३-५० अक्षरांचा फक्त small letters,अंक व special characters - . _ @ मध्ये)  
Password (हा ३-५० अक्षरांचा एक कॅपिटल,एक स्मॉल लेटर, अंक व special characters - . _ @ मध्ये ) आपल्या इच्छेनुसार टाकावा. व तो परत Confirm Password मधेही टाकून  Sign Up करावे.
५.   प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपण DigiLocker च्या Dashboard वर याल.
६.   आता आपला आधार क्रमांक आधार लिंकला जावून टाकावा. व तो otp  ने confirm करावा.
७.   यान्वये सर्व विभागाला निवडून संधार्भीय माहिती भरून आपली कागदपत्रे मिळवावीत.


माझ्या डिजिटल लॉकरमध्ये कागपत्र कसे अपलोड करावे? (संधर्भ- विकासापिडीया)
अपलोड डॉक्युमेंट ही सुविधा माझी प्रमाणपत्रेया सदरात उपलब्ध आहे.
1.       सर्वप्रथम दिलेल्या यादीतून कागदपत्राचा प्रकार निवडा. (एसएससी प्रमाणपत्र, एचएससी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र इ.)
2.       कागदपत्राचे नाव पुरवा.
3.       कागदपत्राचा जो प्रकार असेल त्यानुसार, त्याच्याशी संबंधित अन्य तपशील भरायचा आहे.
4.       आपल्याजवळील मशीनमध्ये असलेली या कागदपत्राची फाइल डिजिटल लॉकरवर अपलोड करण्यासाठी निवडा.  अपलोड करण्यात येणाऱ्या प्रत्येक फाइलचा आकार 1MB हून अधिक नसावा. [1 MB हा फाइलचा जास्तीत जास्त मोठा आकार] pdf, jpg, jpeg, png, bmp and gif प्रकारच्या फाइलच केवळ स्वीकारल्या जातील. कागदपत्राचे वर्णन द्या. (कमाल 50 वर्ण)
5.       अपलोडबटन दाबा.
अपलोड यशस्वी झाल्यानंतर ते कागदपत्र अपलोड झालेली कागदपत्रेया सदरात दिसतील.

 (संधर्भ- विकासापिडीया)
डिजिलॉकर च्या वेबसाईट वर जाण्यासाठी पुढील बटनावर क्लीक करा

MAHA TEACH android app : New Updates




Maha Teach :       
Maharashtra High School and Junior College Teacher



A website to help Maharashtra High School and Junior College Teacher launched new updates on 21/06/2018 in its Android Application. to download this new updated MAHA TEACH android app click on following link-

Version 1.0
Build 1.84.s
Updates Available on 21-06-2018 
Or     
Direct Download



Google Input Tool



 गूगल इनपुट टूल Google Input Tool च्या मदतीने मराठी टाईप कसे करावे ?
संगणकावर मराठी टाइप करणे ही कठीण बाब आहे.  एखादा मजकूर आपण एखाद्या सॉफ्टवेअर मदतीने टाईप केला तर तो वेबपेज वा दुसऱ्या संगणकावर दिसणे त्या विशिष्ठ संगणक फॉन्ट (लिपी) अभावी शक्य नसते.

अश्या वेळी google input tool आपल्याला सहज मदत करेल.
त्याचा इन्स्टॉलेशन व वापर कसा करावे हे पाहु.

Google Input Tool संगणकावर कसे इन्स्टॉल करावे:
१. प्रथम गूगल या सर्चइंजिन वर जावून Google Input Tool सर्च करा अथवा खालील लिंक वरून 

Google Input Tool Download करण्यासाठी खालील लिंक बटनावर क्लिक करा...........
https://drive.google.com/file/d/10haxDCK087euQTmamhxi_6wvkhbKbf4B/view?usp=sharing

स्‍थापना (Installation)

 

डाऊनलोड करण्यासाठी आणि स्थापित करण्यासाठी, या पायऱ्यांचे अनुसरण करा:
  1. डाउनलोड पृष्ठावर, चेकबॉक्सेस चेक करून भाषा निवडा. त्याच क्लायंट मशिनवर इनपुट साधनासाठी एकापेक्षा अधिक भाषा स्थापित करता येते.
  2. "मला Google सेवा अटी आणि गोपनियता धोरण मान्य आहे" ह्याच्या अगोदरचा चेकबॉक्स निवडा, आणि इन्स्टॉलर डाऊनलोड करण्यासाठी "डाऊनलोड" बटणावर क्लिक करा.
  3. डाऊनलोड पूर्ण झाल्यावर इन्स्टॉलर चालवा, आणि स्क्रिनवरील सूचनांचे पालन करा
टीप: प्रति मशीन Google इनपुट साधनांचा केवळ एक प्रसंग स्थापित केला जाईल, परंतु प्रत्येक वापरकर्त्यासाठी कॉन्फिगरेशन भिन्नपणे सेट केले जाऊ शकते.

विस्थापित करा (Uninstall)

विस्थापित करण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा:
  1. "प्रारंभ करा" मेनू वर क्लिक करा.
  2. "कंट्रोल पॅनेल" निवडा आणि त्यानंतर "प्रोग्राम जोडा किंवा काढा" वर जा.
  3. फ्रेमवर्कसह सर्व भाषा विस्थापित करण्यासाठी:
    • प्रोग्राम सूचीमध्ये, "Google इनपुट साधने" निवडा त्यानंतर बटण "बदला/काढा" वर क्लिक करा.
    • "Google इनपुट साधने विस्थापित करा" संवाद बॉक्समध्ये, "होय" क्लिक करा.
    • त्याचा परिणाम लागू होण्यासाठी आपणाला संगणक रिस्टार्ट करावा लागेल.
  4. एक भाषा विस्थापित करण्यासाठी:
    • प्रोग्राम सूचीमध्ये, "Google इनपुट [भाषा]" निवडा त्यानंतर बटण "बदला/काढा" क्लिक करा.
    • "Google इनपुट [भाषा] विस्थापित करा" संवाद बॉक्समध्ये, "होय" क्लिक करा.

Input tool इन्स्टॉलेशन दरम्यान काही अडचण आल्यास खालील लिंक वर जाऊन योग्य ती मदत मिळवा


संगणकासाठी उपयुक्त सर्व marathi fonts download करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.


Maha Teach Android App


Maha Teach :       
Maharashtra High School and Junior College Teacher



A website to help Maharashtra High School and Junior College Teacher launched new updates in its Android Application. to download this new updated MAHA TEACH android app click on following link-

१० वी १२ वी इ मार्कशीट E Marksheet


१० वी १२ वी इ मार्कशीट

दहावी-बारावीची मार्कलिस्ट किंवा बोर्ड सर्टिफिकेट हारवले व खराब झाले असेल तर अशा वेळी त्याची दुय्यम प्रत मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या कार्यालयात आपल्या शाळेमार्फत अर्ज करावा लागतो. हा अर्ज करण्याची प्रक्रिया  वेळखाऊ व त्रासदायक आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने  इ मार्कशीट संकल्पना पुढे आणली आहे.

त्यासाठी
https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp   या संकेतस्थळावर जाऊन login किंवा नोंदणी करावी लागणार आहे. बोर्डाच्या याच संकेतस्थळावर आपण मार्क्सचे online व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी करू शकतो.

ऑनलाइन मार्कलिस्ट download करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी लागेल:

Online दहावी व बारावी गुणपत्रक download करण्यासाठी
खालील बाबी आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
१.  दहावी व बारावीच्या गुणपत्रिक झेरॉक्स
२.  मोबाइल otp प्राप्त करण्यासाठी
३.  Email Address

कृती:
  1. प्रथम आपल्या संगणकाचे किंवा मोबाईल चे इंटरनेट चालू करा.
  2. कोणतेही वेब ब्राऊजर उदाहरणात google chrome मोझिला फायरफॉक्स इंटरनेट-एक्सप्लोअरर उघडा.
  3. ब्राऊजरच्या ऍड्रेस बार मध्ये  https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp  टाईप करा किंवा गुगल सर्च इंजिनवर जाऊन इ मार्कशीट सर्च करा  त्याखालील आलेल्या पहिल्या लिंकला क्लिक करा. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  4. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची मार्कशीट संकेतस्थळ उघडेल.
  5. या संकेतस्थळाच्या डाव्या बजूला create new account वर क्लिक करा.
  6. यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म online मार्कशीट वेरीफिकेशन वरील माहिती भरा. ही माहिती दहावी किंवा बारावीच्या गुणपत्रिका नुसारच भरावी.
  • गूणपत्रकावरील नाव आहे तसेच भरा.
  • त्यानंतरही कॅटेगरी मध्ये Individual पर्याय निवडा.
  • रजिस्ट्रेशन मध्ये ssc and hsc board हा पर्याय निवडा.
  • त्याखाली आपला चालू मोबाईल नंबर टाका जेणेकरून त्यावर otp प्राप्त होऊ शकेल मात्र हा मोबाईल नंबर यापूर्वी या संकेतस्थळावर वापरण्यात आलेला नसावा.
  • त्याखालील बॉक्समध्ये ई-मेल अड्रेस काळजीपूर्वक भरा आणि रजिस्ट्रेशन नंतर हाच आपला युजर नेम असेल.
  • यानंतर पासवर्ड टाकावा तो संयुक्त स्वरूपामध्ये असला पाहिजे उदाहरणार्थ Admin@123
  • आता पासवर्ड confirm करावा व त्याखाली दिसनारा  व्हेरिफिकेशन कोड टाकावा.
  • I Agree ला क्लिक करावे व त्याखालील Register या बटनावर क्लिक करावे.
  • यानंतर आपले रजिस्ट्रेशन कन्फर्म करण्यासाठी आपल्या मोबाईलवर OTP पाठवण्यात येईल तो टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.


यानंतर verify ssc and hsc marksheet यावर जाऊन युजरनेम म्हणजेच ई-मेल अड्रेस टाकून, पासवर्ड टाकावा व त्याखालील व्हेरिफिकेशन कोड टाकून Login करावे.

लॉगिन झाल्यानंतर:
  1. verify ssc and hsc marksheet यावर जाऊन
  2. येणारी माहिती ssc and hsc marksheet वरून अचूक भरावी
  3. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली येणाऱ्या बटनावर क्लिक केल्यानंतर
  4. PDF File Download होईल.

 इ मार्कशीट आता डीजी लॉकर Digi-locker वरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. डीजी लॉकर Digi-locker संधार्भीय अधिक माहितीसाठी पुढील लिंकला क्लिक करा