डिजिलॉकर : DigiLocker/ Digital
Locker हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानावर पडतो. त्यामुळे डिजिलॉकर DigiLocker/ Digital Locker म्हणजे
काय? त्याचा वापर का व कसा करावा ? या
सर्व बाबी आपल्यासमोर येतील. त्यामुळे ही संकल्पना सविस्तर
पाहूया.
डिजिलॉकर च्या वेबसाईट वर जाण्यासाठी पुढील बटनावर क्लीक करा
डिजिलॉकर (DigiLocker) ही
एक भारत सरकार द्वारे
तयार एक डिजिटल लॉकर सेवा आहे. ही सेवा
फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु झाली. या सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या
वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. ही भंडारण जागा (Storage) आधार या सेवेशी जोडलेली
आहे.प्रत्येक नागरिकास सदस्यास यात सुमारे १जीबी इतकी
जागा मिळते.
ही
जागा, त्या सदस्याचे वैयक्तिक दस्तऐवज, जसे: विद्यापिठ
अथवा मॅट्रिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका,स्थायी
खाते क्रमांक(पॅन),व्होटर आयडी कार्ड इत्यादी ठेवण्यास
वापरण्यात येऊ शकते.याचे संलग्नीकरण वेगवेगळ्या खात्यांशी करण्यात आलेले आहे.
त्यानुसार, तेथून थेट त्या सदस्यास आपली वैयक्तिक माहिती
प्राप्त करता येते. जसे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन
परवाना इत्यादी. अजून ही सेवा पूर्ण ताकतीने सुरु झालेली नाही. एकदा ती तशी
झाल्यावर,व शासनाच्या अनेक खात्यांचा डाटा त्याचेशी संलग्न
झाल्यावर, सदस्य/नागरिक त्याचेसंबंधी कोणतेही कागदपत्रे थेट
संगणकावर/भ्रमणध्वनीवर उतरवून घेऊ शकेल, आपले अनेक दस्तऐवज
हे प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही.
यात
दुसरी सोय अशीही आहे की,
नोकरी इत्यादीसाठी आवेदन करतांना, ज्या
कागदपत्रांच्या प्रती द्याव्या लागत होत्या, त्या आता
द्याव्या लागणार नाहीत. सदस्य संबंधितांस त्याचे कागदपत्रांचा या संकेतस्थळावरील
दुवा उपलब्ध करून देउ शकतो त्यावरून नोकरी देणारी संस्था / व्यक्ति ते थेट पाहू व
तपासू शकेल.
याचे
संकेतस्थळावर,
सदस्यास सदस्यनाव व परवलीचा शब्द याद्वारे सनोंद प्रवेश करता
येते.पर्याय म्हणून, विपत्राद्वारे किंवा आधार
क्रमांकानुसारही यास पोहोच आहे.
(संधर्भ – विकिपीडिया)
डिजिलॉकर का वापरावे?
डिजिलॉकर वापराचे फायदे :
१.
आपण आपल्या इच्छेनुसार कधीही, कोठेही आपली
महत्वाची कागदपत्रे पाहू, वापरू, इतरांना डिजिटल स्वरुपात पाठवू शकतो.
२.
ही सुविधा मोफत व सुरक्षित आहे.
३.
कागदमुक्त प्रशासन व डिजिटल भारत चा एक भाग
आहे.
४.
एखाद्या विभागाने पारित केलेली कागदपत्रे
तत्काळ व इतर कोणत्याही दुव्याशिवाय प्राप्त करता येतात.
५.
एकाच ठिकाणी आधार क्रमांकावर सर्व महत्वाची
कागदपत्रे उदा. पॅन कार्ड , आधार कार्ड, वाहन परवाना, वाहन नोंदणी प्रत, दहावी,
बारावी गुणपत्रक तसेच बोर्ड प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र असी अनेक कागदपत्रे मूळ व
डिजिटल स्वरुपात व इत्तर कागदपत्रे आपण अपलोड करू शकता.
६.
डिजिलॉकर वर अपलोड केलेली कागदपत्रे आपण
डिजिटल स्वाक्षरी माध्यमातून स्वयं साक्षांकित करू शकता.
७.
ही सुविधा संगणकावर तसेच मोबाईल वरही वापरता
येते.
डिजिलॉकर मोबाईल वर कसे वापरावे :
१.
प्रथम गूगल प्ले स्टोर्स वर जावून DigiLocker सर्च करावे. व Download करून install करावे.
२.
Sign Up वर क्लिक करून आपला मोबाईल क्रमांक (आधार लिंक असलेला) टाकावा.
३.
आलेला OTP (One Time Password) verify करावा.
४.
यानंतर आपला
User Name (हा ३-५० अक्षरांचा फक्त small letters,अंक व special characters - . _ @ मध्ये) व
Password (हा ३-५० अक्षरांचा एक कॅपिटल,एक स्मॉल लेटर, अंक व special characters - . _ @ मध्ये ) आपल्या इच्छेनुसार टाकावा. व तो परत Confirm Password मधेही टाकून Sign Up करावे.
५.
प्रक्रिया पूर्ण
झाल्यावर आपण DigiLocker च्या Dashboard वर याल.
६.
आता आपला आधार
क्रमांक आधार लिंकला जावून टाकावा. व तो otp
ने confirm करावा.
७.
यान्वये सर्व
विभागाला निवडून संधार्भीय माहिती भरून आपली कागदपत्रे मिळवावीत.
माझ्या डिजिटल लॉकरमध्ये कागपत्र कसे अपलोड
करावे? (संधर्भ- विकासापिडीया)
अपलोड डॉक्युमेंट ही सुविधा ‘माझी प्रमाणपत्रे’ या सदरात उपलब्ध आहे.
1. सर्वप्रथम
दिलेल्या यादीतून कागदपत्राचा प्रकार निवडा. (एसएससी प्रमाणपत्र, एचएससी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र इ.)
2. कागदपत्राचे
नाव पुरवा.
3. कागदपत्राचा
जो प्रकार असेल त्यानुसार, त्याच्याशी संबंधित अन्य
तपशील भरायचा आहे.
4. आपल्याजवळील
मशीनमध्ये असलेली या कागदपत्राची फाइल डिजिटल लॉकरवर अपलोड करण्यासाठी निवडा. अपलोड करण्यात येणाऱ्या प्रत्येक फाइलचा आकार 1MB हून अधिक नसावा. [1 MB हा फाइलचा जास्तीत जास्त मोठा
आकार] pdf, jpg, jpeg, png, bmp and gif प्रकारच्या फाइलच
केवळ स्वीकारल्या जातील. कागदपत्राचे वर्णन द्या. (कमाल 50 वर्ण)
5. ‘अपलोड’ बटन दाबा.
अपलोड यशस्वी झाल्यानंतर ते कागदपत्र ‘अपलोड झालेली कागदपत्रे’ या सदरात दिसतील.
(संधर्भ- विकासापिडीया)
डिजिलॉकर च्या वेबसाईट वर जाण्यासाठी पुढील
बटनावर क्लीक करा