Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

सेवानिवृत्ती पत्र


 शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला निरोप समारंभ दिला जातो. या निरोप समारंभात त्या कर्मचार्याला सेवानिवृत्ती पत्र प्रदान करणे आवश्यक असते. या पत्राची एक प्रत त्या रिक्त जागेवर नवीन कर्मचारी भरतेवेळी ( पद रिक्त होण्याचे कारण म्हणून ) सादर करावी लागते. कर्मचारी निवृत्ती पूर्वीच त्याच्याकडील असलेले चार्ज दुसर्या कर्मचार्यांना देणे गरजेचे असते जेणेकरून सेवानिवृत्त कर्मचार्याला सेवानिवृत्तीनंतर प्रसंगी बोलाविण्याची गरज भासणार नाही.



सेवानिवृत्ती पत्र नमुना


प्रति,

______________________

______________________


महोदय,

सबब पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की,

आपण श्री __________________________ दिनांक__________ पासून ___________ या पदावर यशस्वीरीत्या कार्यरत आहात. व आज दिनांक ___________ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहात. आपण _________________ _______________________ मध्ये _____ वर्षामध्ये केलेली समाधानकारक कारकीर्द नेहमीच स्मरणार्थ राहणारी आहे.

यापुढेही आम्हाला मार्गदर्शनासाठी नेहमी तत्पर असाल अशी इच्छा व्यक्त करतो.

 आपले भावी आयुष्य आनंदमय व आरोग्यमय राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो.

कळावे.



आपला विश्वासू



वरील नमुना PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा..