Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

जातीचा प्रवर्ग शोध
आपल्याला आपली जात कोणत्या प्रवर्गात येते हे पाहायचे असेल किंवा बऱ्याचदा वर्ग शिक्षकांना हजेरीपट लिहित असताना विद्यार्थ्यांच्या जात व प्रवर्ग लिहित असताना अडचणी येतात. ही समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) (BARTI)  (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) च्या संकेतस्थळा वर आपल्या जातीचा प्रवर्ग व त्या त्यातील क्रमांक शोधता येतो.त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. वरील बटनावर क्लिक केल्यानंतर आपण BARTI या संकेतस्थळा वर जाल तेथे गेल्यानंतर आपल्याला ज्या जातीचा प्रवर्ग शोधावयाचा आहे त्या जातीचे पहिली तीन अक्षरे टाईप करून सर्च वर क्लिक करावे, यावर महाराष्ट्र शासनाच्या यादीनुसार आपण सर्च केलेली जात कोणत्या प्रवर्गात आहे ते दिसेल.
उदा . हिंदू चांभार ही जात कोणत्या प्रवर्गात येते हे शोधण्यासाठी आपल्याला cham ही अक्षरे सर्च करावी लागतील व result समोर SC असा मिळेल.


बर्याचदा आपण जातीचा प्रवर्ग शोध सर्च इंजिन वर सर्च केल्यानंतर इतर राज्यांच्या यादी किंवा केंद्र सरकारची यादी सर्च होवू शकते किंवा यादीमध्ये सरकारकडून काही बदल झाला असेल  तर तो आपल्याला कळणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्याच संकेतस्थळ याचा वापर करणे गरजेचे आहे. 

निर्धारित केलेल्या जाती व त्यांचे प्रवर्ग pdf मध्ये मिळवण्यासाठी खाली क्लिक करा.


No comments: