१० वी १२ वी इ मार्कशीट
दहावी-बारावीची मार्कलिस्ट किंवा बोर्ड सर्टिफिकेट हारवले व खराब झाले असेल तर अशा वेळी त्याची दुय्यम प्रत मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या कार्यालयात आपल्या शाळेमार्फत अर्ज करावा लागतो. हा अर्ज करण्याची प्रक्रिया  वेळखाऊ व त्रासदायक आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने  इ मार्कशीट संकल्पना पुढे आणली आहे.
त्यासाठी 
 https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp   या संकेतस्थळावर जाऊन login किंवा नोंदणी करावी लागणार आहे. बोर्डाच्या याच संकेतस्थळावर आपण मार्क्सचे online व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी करू शकतो.
ऑनलाइन मार्कलिस्ट download करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी लागेल:
Online दहावी व बारावी गुणपत्रक download करण्यासाठी
खालील बाबी आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
१.  दहावी व बारावीच्या गुणपत्रिक झेरॉक्स
२.  मोबाइल otp प्राप्त करण्यासाठी
३.  Email Address
कृती:
- प्रथम आपल्या संगणकाचे किंवा मोबाईल चे इंटरनेट चालू करा.
 - कोणतेही वेब ब्राऊजर उदाहरणात google chrome मोझिला फायरफॉक्स इंटरनेट-एक्सप्लोअरर उघडा.
 - ब्राऊजरच्या ऍड्रेस बार मध्ये https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp टाईप करा किंवा गुगल सर्च इंजिनवर जाऊन इ मार्कशीट सर्च करा त्याखालील आलेल्या पहिल्या लिंकला क्लिक करा. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची मार्कशीट संकेतस्थळ उघडेल.
 - या संकेतस्थळाच्या डाव्या बजूला create new account वर क्लिक करा.
 - यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म online मार्कशीट वेरीफिकेशन वरील माहिती भरा. ही माहिती दहावी किंवा बारावीच्या गुणपत्रिका नुसारच भरावी.
 
- गूणपत्रकावरील नाव आहे तसेच भरा.
 - त्यानंतरही कॅटेगरी मध्ये Individual पर्याय निवडा.
 - रजिस्ट्रेशन मध्ये ssc and hsc board हा पर्याय निवडा.
 - त्याखाली आपला चालू मोबाईल नंबर टाका जेणेकरून त्यावर otp प्राप्त होऊ शकेल मात्र हा मोबाईल नंबर यापूर्वी या संकेतस्थळावर वापरण्यात आलेला नसावा.
 - त्याखालील बॉक्समध्ये ई-मेल अड्रेस काळजीपूर्वक भरा आणि रजिस्ट्रेशन नंतर हाच आपला युजर नेम असेल.
 - यानंतर पासवर्ड टाकावा तो संयुक्त स्वरूपामध्ये असला पाहिजे उदाहरणार्थ Admin@123
 - आता पासवर्ड confirm करावा व त्याखाली दिसनारा व्हेरिफिकेशन कोड टाकावा.
 - I Agree ला क्लिक करावे व त्याखालील Register या बटनावर क्लिक करावे.
 - यानंतर आपले रजिस्ट्रेशन कन्फर्म करण्यासाठी आपल्या मोबाईलवर OTP पाठवण्यात येईल तो टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
 
यानंतर verify ssc and hsc marksheet यावर जाऊन युजरनेम म्हणजेच ई-मेल अड्रेस टाकून, पासवर्ड टाकावा व त्याखालील व्हेरिफिकेशन कोड टाकून Login करावे.
लॉगिन झाल्यानंतर:
- verify ssc and hsc marksheet यावर जाऊन
 - येणारी माहिती ssc and hsc marksheet वरून अचूक भरावी
 - ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली येणाऱ्या बटनावर क्लिक केल्यानंतर
 - PDF File Download होईल.
 

