Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

MH-GK : General Knowledge for Sainiki Schools in Maharashtra

MH-GK: General Knowledge for Sainiki Schools in Maharashtra
                    महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सैनिकी शाळा स्थापन करण्यात आलेली आहे. या सैनिकी शाळेचे चा उद्देश
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA साठी मुलांची पूर्वतयारी करणे हा आहे. यासाठी त्यांच्या दैनिक अभ्यासक्रमांमध्ये सैनिकी प्रशिक्षण व अकरावी, बारावी साठी जनरल नॉलेज GK म्हणजेच सामान्य ज्ञान हा विषय अभ्यासासाठी ठेवण्यात आलेला आहे. 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे. यांच्या वतीने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी व शिक्षकांसाठी MH-GK : General Knowledge for Sainiki Schools in Maharashtra. या ब्लॉगवर नोट्स, प्रश्नपत्रिका व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा…

                        वास्तविकतः सामान्य ज्ञान हा विषय खूप व्यापक स्वरूपाचा आहे. सध्याच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात सामान्य ज्ञान या विषयास अनन्य साधारण महत्व आहे. एवढेच नव्हे तर व्यक्तिमत्व विकासात व प्रभावी व्यक्तिमत्व विकसित करताना सामान्य ज्ञानाचा आभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुषंगाने सदरील वेबसाईटवर सामान्य ज्ञान या विषयाशी निघडीत साहित्य प्रकाशित करण्यात येते. याचा उपयोग सर्व सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांना होणारच आहे. त्या बरोबरच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA  च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्यानाही होणार आहे. 

No comments: