Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

डिजिलॉकर : DigiLocker/ Digital Locker





डिजिलॉकर : DigiLocker/ Digital Locker हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानावर पडतो. त्यामुळे  डिजिलॉकर  DigiLocker/ Digital Locker म्हणजे काय? त्याचा वापर का व कसा करावा ? या सर्व बाबी आपल्यासमोर येतील. त्यामुळे ही संकल्पना  सविस्तर पाहूया.


डिजिलॉकर च्या वेबसाईट वर जाण्यासाठी पुढील बटनावर क्लीक करा

डिजिलॉकर (DigiLocker) ही एक भारत सरकार द्वारे तयार  एक डिजिटल लॉकर सेवा आहे. ही सेवा फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु झाली. या सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. ही भंडारण जागा (Storage) आधार या सेवेशी जोडलेली आहे.प्रत्येक नागरिकास सदस्यास यात सुमारे १जीबी इतकी जागा मिळते.
 ही जागा, त्या सदस्याचे वैयक्तिक दस्तऐवज, जसे: विद्यापिठ अथवा मॅट्रिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका,स्थायी खाते क्रमांक(पॅन),व्होटर आयडी कार्ड इत्यादी ठेवण्यास वापरण्यात येऊ शकते.याचे संलग्नीकरण वेगवेगळ्या खात्यांशी करण्यात आलेले आहे. त्यानुसार, तेथून थेट त्या सदस्यास आपली वैयक्तिक माहिती प्राप्त करता येते. जसे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन परवाना इत्यादी. अजून ही सेवा पूर्ण ताकतीने सुरु झालेली नाही. एकदा ती तशी झाल्यावर,व शासनाच्या अनेक खात्यांचा डाटा त्याचेशी संलग्न झाल्यावर, सदस्य/नागरिक त्याचेसंबंधी कोणतेही कागदपत्रे थेट संगणकावर/भ्रमणध्वनीवर उतरवून घेऊ शकेल, आपले अनेक दस्तऐवज हे प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही.
यात दुसरी सोय अशीही आहे की, नोकरी इत्यादीसाठी आवेदन करतांना, ज्या कागदपत्रांच्या प्रती द्याव्या लागत होत्या, त्या आता द्याव्या लागणार नाहीत. सदस्य संबंधितांस त्याचे कागदपत्रांचा या संकेतस्थळावरील दुवा उपलब्ध करून देउ शकतो त्यावरून नोकरी देणारी संस्था / व्यक्ति ते थेट पाहू व तपासू शकेल.
याचे संकेतस्थळावर, सदस्यास सदस्यनाव व परवलीचा शब्द याद्वारे सनोंद प्रवेश करता येते.पर्याय म्हणून, विपत्राद्वारे किंवा आधार क्रमांकानुसारही यास पोहोच आहे.
(संधर्भ – विकिपीडिया)


डिजिलॉकर का वापरावे? डिजिलॉकर वापराचे फायदे :
१.   आपण आपल्या इच्छेनुसार कधीही, कोठेही आपली महत्वाची कागदपत्रे पाहू, वापरू, इतरांना डिजिटल स्वरुपात पाठवू शकतो.
२.   ही सुविधा मोफत व सुरक्षित आहे.
३.   कागदमुक्त प्रशासन व डिजिटल भारत चा एक भाग आहे.
४.   एखाद्या विभागाने पारित केलेली कागदपत्रे तत्काळ व इतर कोणत्याही दुव्याशिवाय प्राप्त करता येतात.
५.   एकाच ठिकाणी आधार क्रमांकावर सर्व महत्वाची कागदपत्रे उदा. पॅन कार्ड , आधार कार्ड, वाहन परवाना, वाहन नोंदणी प्रत, दहावी, बारावी गुणपत्रक तसेच बोर्ड प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र असी अनेक कागदपत्रे मूळ व डिजिटल स्वरुपात व इत्तर कागदपत्रे आपण अपलोड करू शकता.    
६.   डिजिलॉकर वर अपलोड केलेली कागदपत्रे आपण डिजिटल स्वाक्षरी माध्यमातून स्वयं साक्षांकित करू शकता.
७.   ही सुविधा संगणकावर तसेच मोबाईल वरही वापरता येते.


 डिजिलॉकर च्या वेबसाईट वर जाण्यासाठी पुढील बटनावर क्लीक करा



डिजिलॉकर मोबाईल वर कसे वापरावे :



१.   प्रथम गूगल प्ले स्टोर्स वर जावून  DigiLocker सर्च करावे. व Download करून install करावे.
२.    Sign Up वर क्लिक करून आपला मोबाईल क्रमांक (आधार लिंक असलेला) टाकावा.
३.   आलेला OTP (One Time Password) verify करावा.
४.   यानंतर आपला
User Name (हा ३-५० अक्षरांचा फक्त small letters,अंक व special characters - . _ @ मध्ये)  व
Password (हा ३-५० अक्षरांचा एक कॅपिटल,एक स्मॉल लेटर, अंक व special characters - . _ @ मध्ये ) आपल्या इच्छेनुसार टाकावा. व तो परत Confirm Password मधेही टाकून  Sign Up करावे.
५.   प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपण DigiLocker च्या Dashboard वर याल.
६.   आता आपला आधार क्रमांक आधार लिंकला जावून टाकावा. व तो otp  ने confirm करावा.
७.   यान्वये सर्व विभागाला निवडून संधार्भीय माहिती भरून आपली कागदपत्रे मिळवावीत.


माझ्या डिजिटल लॉकरमध्ये कागपत्र कसे अपलोड करावे? (संधर्भ- विकासापिडीया)
अपलोड डॉक्युमेंट ही सुविधा ‘माझी प्रमाणपत्रे’ या सदरात उपलब्ध आहे.
1.       सर्वप्रथम दिलेल्या यादीतून कागदपत्राचा प्रकार निवडा. (एसएससी प्रमाणपत्र, एचएससी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र इ.)
2.       कागदपत्राचे नाव पुरवा.
3.       कागदपत्राचा जो प्रकार असेल त्यानुसार, त्याच्याशी संबंधित अन्य तपशील भरायचा आहे.
4.       आपल्याजवळील मशीनमध्ये असलेली या कागदपत्राची फाइल डिजिटल लॉकरवर अपलोड करण्यासाठी निवडा.  अपलोड करण्यात येणाऱ्या प्रत्येक फाइलचा आकार 1MB हून अधिक नसावा. [1 MB हा फाइलचा जास्तीत जास्त मोठा आकार] pdf, jpg, jpeg, png, bmp and gif प्रकारच्या फाइलच केवळ स्वीकारल्या जातील. कागदपत्राचे वर्णन द्या. (कमाल 50 वर्ण)
5.       ‘अपलोड’ बटन दाबा.
अपलोड यशस्वी झाल्यानंतर ते कागदपत्र ‘अपलोड झालेली कागदपत्रे’ या सदरात दिसतील.

 (संधर्भ- विकासापिडीया)
डिजिलॉकर च्या वेबसाईट वर जाण्यासाठी पुढील बटनावर क्लीक करा

जातीचा प्रवर्ग शोध




आपल्याला आपली जात कोणत्या प्रवर्गात येते हे पाहायचे असेल किंवा बऱ्याचदा वर्ग शिक्षकांना हजेरीपट लिहित असताना विद्यार्थ्यांच्या जात व प्रवर्ग लिहित असताना अडचणी येतात. ही समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) (BARTI)  (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) च्या संकेतस्थळा वर आपल्या जातीचा प्रवर्ग व त्या त्यातील क्रमांक शोधता येतो.त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 



वरील बटनावर क्लिक केल्यानंतर आपण BARTI या संकेतस्थळा वर जाल तेथे गेल्यानंतर आपल्याला ज्या जातीचा प्रवर्ग शोधावयाचा आहे त्या जातीचे पहिली तीन अक्षरे टाईप करून सर्च वर क्लिक करावे, यावर महाराष्ट्र शासनाच्या यादीनुसार आपण सर्च केलेली जात कोणत्या प्रवर्गात आहे ते दिसेल.
उदा . हिंदू चांभार ही जात कोणत्या प्रवर्गात येते हे शोधण्यासाठी आपल्याला cham ही अक्षरे सर्च करावी लागतील व result समोर SC असा मिळेल.


बर्याचदा आपण जातीचा प्रवर्ग शोध सर्च इंजिन वर सर्च केल्यानंतर इतर राज्यांच्या यादी किंवा केंद्र सरकारची यादी सर्च होवू शकते किंवा यादीमध्ये सरकारकडून काही बदल झाला असेल  तर तो आपल्याला कळणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्याच संकेतस्थळ याचा वापर करणे गरजेचे आहे. 

निर्धारित केलेल्या जाती व त्यांचे प्रवर्ग pdf मध्ये मिळवण्यासाठी खाली क्लिक करा.


शिक्षण संक्रमण जुलै २०१८




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या “शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत  Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.


शिक्षण संक्रमण जुलै २०१८

शिक्षण संक्रमण  जुलै २०१८     

शिक्षण संक्रमण मे जून २०१८

शिक्षण संक्रमण मे  जून २०१८


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या “शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत  Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.




शिक्षण संक्रमण  मे जून २०१८     

शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी

शिक्षकांनी काय नोंदी ठेवाव्यात
१
वार्षिक नियोजन स्वहस्ते लिहलेले वर्गात लावेले असावे. (वर्षाच्या सुरवातीलाच मुख्याध्यापकांकडून मान्य करून घ्यावे)
२
मासिक नियोजन
३
घटक नियोजन
४
दैनिक टाचण
५
अद्यावतविद्यार्थी हजेरी
६
विद्यार्थी पालक भेट रजिस्टर (वही)
७
सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी अद्यावत केलेल्या असाव्यात.
८
विद्यार्थ्यांचे वेळोवेळी घेतलेले प्रकल्प
९
ज्या प्रश्नांच्या आधारे तोंडी काम घेतले आहे त्याची सूची व त्यानुसार दिलेले विद्यार्थीनिहाय गुणदान
१०
विद्यार्थ्यांकडुन वेळोवळी पूर्ण केलेले स्वाध्याय वर्गकार्य पुस्तके
११
विशेष गरजा असणा-या विद्यार्थ्यां बाबत नोंदी
१२
शैक्षणिक साहित्य.
१३
मुख्याध्यापकांनी दिलेल्या विभागाची जबाबदरी


वर्ग शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी



वर्ग शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी
१
विद्यार्थी संचिका
२
CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके
३
पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .
४
इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.
५
ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .
६
विधार्थी हजेरी .
७
विद्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी.  सर्व परीक्षा (आठवडी परीक्षांसह )
८
वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.
९
पटनोंदणी ,वयाचे दाखले नोंद
१०
वर्ग मंत्रीमंडळ यादी, कार्य नोंदी
११
वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,टाचन  वही .
१२
वर्ग अद्यापण नियोजन
१३
सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल
१४
पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन
१५


वरील माहिती PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील 



MAHA TEACH android app : New Updates




Maha Teach :       
Maharashtra High School and Junior College Teacher



A website to help Maharashtra High School and Junior College Teacher launched new updates on 21/06/2018 in its Android Application. to download this new updated MAHA TEACH android app click on following link-

Version 1.0
Build 1.84.s
Updates Available on 21-06-2018 
Or     
Direct Download



इयत्ता पहिली ते दहावी विषयवार तासिका विभागणी

इयत्ता पहिली ते दहावी विषयवार तासिका विभागणी







महाराष्ट्र शासनाच्या विद्या विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक ०५/१०/२०१७ च्या परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून पहिली ते दहावी करिता विषयवार तासिका विभागणी  बदलण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते आठवी विषयवार तासिका विभागणी बाबत २८ एप्रिल २०१७ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. सदर परिपत्रकातील तासिका विभागणी विभागणीत अंशतः बदल करण्यात येत आहे. सदर परिपत्रक २०१७-१८ पासून लागू करण्यात येत आहे.

इयत्ता १ ली  ते १० वी  विषयवार तासिका विभागणी बदल :

१.    इयत्ता पहिली ते दहावी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी ४५ तासिका ऐवजी ४८ तासिका असेल.
२.    एका वर्गाचा आठवड्याचा एकूण कार्यकाल पूर्वी २६.४५ मिनिटांचा होता. प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर कार्यकाल २७.१० मिनिटे होईल यामुळे एकूण कार्यकालात २५ मिनिटांची वाढ होईल.
३.    दिनांक २८ एप्रिल २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणेच सोमवार ते गुरुवार ८ तासिका असतील. पहिली तासिका ४० मिनिटे व पुढील प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची राहील
४.    सुधारित परिपत्रकानुसार शुक्रवारी ८ तासिका ऐवजी ९ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटाची व पुढील प्रत्येक तासिका ३० मिनिटाची राहील.
५.    शनिवारी ५ तासिका ऐवजी ७ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटाची व पुढील प्रत्येक तासिका ३० मिनिटाची राहील.
६.    सुधारित वेळापत्रकात शुक्रवार व शनिवारच्या तासिका ह्या कला आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयासाठी देण्यात याव्यात.

इयत्ता पहिली ते दहावी विषयवार तासिका विभागणी परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा