Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

Windows 10 मध्ये Internet Explorer सापडत नसल्यास


 शालार्थ व कोणतीही शासकीय संकेतस्थळ वापरण्यासाठी Internet Explorer 8+ चा वापर करावा लागतो. मात्र विंडोज १०,११ मध्ये Internet Explorer सापडत नसल्याचे दिसून येते. इंटरनेट एक्सप्लोअर ऐवजी Microsoft Edge चालू होते. मात्र शालार्थ व काही शासकीय संकेतस्थळ वापरण्यासाठी Internet Explorer असणे आवश्यक असल्याने त्यासाठी उपाय शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. किंबहुना बरेचजण विंडोज १० ऐवजी विंडोज ७, 8 वापरणे पसंत करतात. 


यावर उपाय म्हणून आपल्या
विंडोज १०  मध्ये खालील स्टेप्स केल्यास इंटरनेट एक्सप्लोअर ११ (Internet Explorer 11) कार्यान्वित होऊ शकते.     

Control Panel\Programs\Programs and Features मध्ये जावून 

Turn windows features on or off वर जावून Internet Explorer 11 ला टिक करून OK करावे.

PC restart केल्यावर आपणास  Internet Explorer 11 कार्यान्वित झालेले दिसून येईल.


वरील कृती करूनही Internet Explorer सापडत नसल्यास

This PC वर जावून settings ला क्लिक करावे. 

Settings मध्ये Apps मध्ये Apps & Features मधील Optional Features मध्ये

 Internet Explorer 11 ला Install करा.  


PC restart केल्यावर आपणास  Internet Explorer 11 कार्यान्वित झालेले दिसून येईल.





विंडोज १० मध्ये Internet Explorer उघडल्यास Microsoft Edge  उघडणे .....

 

बर्याचदा विंडोज १० मध्ये Internet Explorer उघडल्यास Microsoft Edge हे वेब ब्राउझर उघडण्याची समस्या येते. त्यासाठी...

 Microsoft Edge हे वेब ब्राउझर उघडा व search bar वर टाईप करा.... 

                          edge://settings/defaultBrowser

settings मध्ये  Default browser  ला क्लिक करा..

Internet Explorer compatibility>>

Let Internet Explorer open sites in Microsoft Edge>>

पुढे   Never हे option निवडा

व संगणक Restart करा...



PC restart केल्यावर आपणास  Internet Explorer 11 कार्यान्वित झालेले दिसून येईल.


1. Open Internet Explorer browser

2. Go to Tools > select internet Options

3. Go to Advanced > Under settings, look for the setting "Hide the button (next to the New Tab button) that opens Microsoft Edge" and check the box.

4. Please check if you open new tab if Edge still opens.


1. Open Internet Explorer browser

2. Go to Tools > select internet Options

3. Go to Advanced > click Reset button below.

4. Please check if you open new tab if Edge still opens.

सेवानिवृत्ती पत्र


 शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला निरोप समारंभ दिला जातो. या निरोप समारंभात त्या कर्मचार्याला सेवानिवृत्ती पत्र प्रदान करणे आवश्यक असते. या पत्राची एक प्रत त्या रिक्त जागेवर नवीन कर्मचारी भरतेवेळी ( पद रिक्त होण्याचे कारण म्हणून ) सादर करावी लागते. कर्मचारी निवृत्ती पूर्वीच त्याच्याकडील असलेले चार्ज दुसर्या कर्मचार्यांना देणे गरजेचे असते जेणेकरून सेवानिवृत्त कर्मचार्याला सेवानिवृत्तीनंतर प्रसंगी बोलाविण्याची गरज भासणार नाही.



सेवानिवृत्ती पत्र नमुना


प्रति,

______________________

______________________


महोदय,

सबब पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की,

आपण श्री __________________________ दिनांक__________ पासून ___________ या पदावर यशस्वीरीत्या कार्यरत आहात. व आज दिनांक ___________ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहात. आपण _________________ _______________________ मध्ये _____ वर्षामध्ये केलेली समाधानकारक कारकीर्द नेहमीच स्मरणार्थ राहणारी आहे.

यापुढेही आम्हाला मार्गदर्शनासाठी नेहमी तत्पर असाल अशी इच्छा व्यक्त करतो.

 आपले भावी आयुष्य आनंदमय व आरोग्यमय राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो.

कळावे.



आपला विश्वासू



वरील नमुना PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा..



शिक्षण संक्रमण मध्ये लेख प्रकाशीत करणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित  शिक्षण संक्रमण या मासिकामध्ये लेख प्रकाशित करण्यासाठी खालील प्रक्रिया करावी. 

शिक्षण संक्रमण साठी लेख कोण पाठवू शकतो:

विद्यार्थी, पालक व शिक्षकांना साहित्य पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे  यांच्या कडून करण्यात येत आहे.

साहित्य कसे असावे :

१.               शिक्षकांनी शालेय विषयाशी निगडीत, विद्यार्थी व शिक्षकांना प्रगल्भ करणारे, त्यांचा गुणात्मक विकास करणारे आपले स्वलिखित साहित्य अंकासाठी पाठवावे.

२.               पुनर्रचित अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धती, विषयनिहाय पाठ्यपुस्तकातील आशय, अध्यापन पद्धती, शालेय उपक्रम या विषयांवर आपले विचार व्यक्त व्हावेत. अर्थात याशिवाय शिक्षक व विद्यार्थी यांचे शालेय हित लक्षात घेऊन शैक्षणिक विषयावर लेख पाठवावेत.

३.               लेख हा स्वयं लिखित असला पाहिजे तो वाङमयचौय असता कामानये.

४.               लेखामध्ये आक्षेपार्ह मजकूर तसेच कोणत्याही प्रकारे व्यक्ती, ऐतिहासिक घटना, जात, धर्म, पंथ, शासन, जातीभेद, वर्णभेद, समूह भावना या संदर्भात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीत्या आक्षेप सूचित होईल किंवा अनादर दर्शविला जाईल अशा स्वरूपाची माहिती किंवा मजकूर समाविष्ट असणार नाही.

५.               लेखातील मते व आशय बाबत सर्व अधिकार लेखकाचे राहतील.

६.               लेख यापूर्वी कोठेही छापला गेलेला नसला पाहिजे.

वरील प्रकारच्या सर्व लेखांचे शिक्षण संक्रमण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत स्वागतच होईल. ते ‘शिक्षण संक्रमण’ च्या अंकात प्रकाशित केले जाईल. तसेच आलेल्या लेखातून निवडक लेखांवर, संपादक मंडळाकडून आवश्यक ते संस्कार करूनच लेख प्रकाशित केले जातील, याची लेखकांनी नोंद घ्यावी.

लेख देण्यासाठीची प्रक्रिया:

  शिक्षण संक्रमण मध्ये लेख देण्यासाठी येथे   क्लिक करा .......

१.               लिंकला क्लिक केल्यानंतर शिक्षण संक्रमण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचा  फॉर्म उघडेल या फॉर्म मधील सर्व माहिती भरावी.

२.               लेखकाचे हमीपत्र / संमती पत्र भरून त्यावर स्वाक्षरी करून त्याचा फोटो काढून अपलोड करावा लागेल. 

३.               आपला लेख सॉफ्ट कॉपी Soft Copy मध्ये असावा.

४.               लेखाची फॉन्ट font यासोबत आपल्याला अपलोड करावयाची आहे. 

५.               ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर submit बटनावर क्लिक करावे.

६.               आपला लेख  शिक्षण संक्रमण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे. यांना प्राप्त होईल. व तो सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकाशित होईल.  

लेखकाचे हमीपत्र / संमती पत्र नमुना डाउनलोड करण्यासाठी     येथे क्लिक करा.  

कार्यालयास संपर्क:

शिक्षण संक्रमण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कार्यालयास संपर्क करण्यासाठी   येथे क्लीक करा. याबरोबर एक संपर्क फॉर्म उघडेल आपले नाव ईमेल फोन भरून आपला मेसेज लिहून पाठवावा.   

 शिक्षण संक्रमण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचा पत्ता:

पत्ता:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

सर्व्हे नं. 832-, फायनल प्लॉट क्रमांक 178 179,

बालचित्रवाणी जवळ, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे,

भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे-411 004. महाराष्ट्र (भारत)

 फोन: 020-2570500

 ई-मेल: shikshan.sankraman@gmail.com

 

   

शिक्षण संक्रमण सप्टेंबर २०१९


बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्र बदलत आहे. आभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व मूल्यमापन पद्धती बदलत आहे. शिक्षण संक्रमण या माध्यमातून पाठ्यपुस्तक मंडळ, परीक्षा मंडळ, शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज यांमध्ये आदानप्रदान व समन्वयाचे काम करत आहे. तसेच विविध शिक्षक अध्ययन अध्यापनात प्रयोगशीलता करताना दिसून येतात.  शिक्षण संक्रमण हे मासिक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येते. या मासिकामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारे बदलमूल्यमापन पद्धतीमधील बदलत्याबरोबर बदलत्या अभ्यासक्रमानुसार बदलत्या अध्यापन पद्धती याविषयीचे मार्गदर्शन केले जाते. शासनामार्फत व बोर्डामार्फत पारित केलेली परिपत्रके सूचना या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केल्या जातात शिक्षणक्षेत्र संदर्भ व्यक्ती व शिक्षक यांचे विविध विषयावरील व अध्यापन वरील लेख या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केले जातात.

अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करत असताना शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात त्याबरोबरच प्रयोगशीलताअनुभव इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरू शकते यासाठी विचारांचे आदान-प्रदान होणे गरजेचे असते व कार्य शिक्षण संक्रमण या माध्यमातून करण्यात येते. 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळपुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत  Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

शिक्षण संक्रमण  सप्टेंबर २०१९    

इतर महिन्याचे शिक्षण संक्रमण मिळवण्यासाठी खालील लिंक ला जावून Download करू शकता.

                                                                              

  


शिक्षण संक्रमण ऑगस्ट २०१९


बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्र बदलत आहे. आभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व मूल्यमापन पद्धती बदलत आहे. शिक्षण संक्रमण या माध्यमातून पाठ्यपुस्तक मंडळ, परीक्षा मंडळ, शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज यांमध्ये आदानप्रदान व समन्वयाचे काम करत आहे. तसेच विविध शिक्षक अध्ययन अध्यापनात प्रयोगशीलता करताना दिसून येतात.  शिक्षण संक्रमण हे मासिक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येते. या मासिकामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारे बदलमूल्यमापन पद्धतीमधील बदलत्याबरोबर बदलत्या अभ्यासक्रमानुसार बदलत्या अध्यापन पद्धती याविषयीचे मार्गदर्शन केले जाते. शासनामार्फत व बोर्डामार्फत पारित केलेली परिपत्रके सूचना या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केल्या जातात शिक्षणक्षेत्र संदर्भ व्यक्ती व शिक्षक यांचे विविध विषयावरील व अध्यापन वरील लेख या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केले जातात.

अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करत असताना शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात त्याबरोबरच प्रयोगशीलताअनुभव इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरू शकते यासाठी विचारांचे आदान-प्रदान होणे गरजेचे असते व कार्य शिक्षण संक्रमण या माध्यमातून करण्यात येते. 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळपुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत  Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

शिक्षण संक्रमण  ऑगस्ट २०१९    

इतर महिन्याचे शिक्षण संक्रमण मिळवण्यासाठी खालील लिंक ला जावून Download करू शकता.

                                                                              

  


शिक्षण संक्रमण जुलै २०१९


बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्र बदलत आहे. आभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व मूल्यमापन पद्धती बदलत आहे. शिक्षण संक्रमण या माध्यमातून पाठ्यपुस्तक मंडळ, परीक्षा मंडळ, शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज यांमध्ये आदानप्रदान व समन्वयाचे काम करत आहे. तसेच विविध शिक्षक अध्ययन अध्यापनात प्रयोगशीलता करताना दिसून येतात.  शिक्षण संक्रमण हे मासिक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येते. या मासिकामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारे बदलमूल्यमापन पद्धतीमधील बदलत्याबरोबर बदलत्या अभ्यासक्रमानुसार बदलत्या अध्यापन पद्धती याविषयीचे मार्गदर्शन केले जाते. शासनामार्फत व बोर्डामार्फत पारित केलेली परिपत्रके सूचना या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केल्या जातात शिक्षणक्षेत्र संदर्भ व्यक्ती व शिक्षक यांचे विविध विषयावरील व अध्यापन वरील लेख या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केले जातात.

अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करत असताना शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात त्याबरोबरच प्रयोगशीलताअनुभव इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरू शकते यासाठी विचारांचे आदान-प्रदान होणे गरजेचे असते व कार्य शिक्षण संक्रमण या माध्यमातून करण्यात येते. 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळपुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत  Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

शिक्षण संक्रमण  जुलै    २०१९    

इतर महिन्याचे शिक्षण संक्रमण मिळवण्यासाठी खालील लिंक ला जावून Download करू शकता.

                                                                              

  


शिक्षण संक्रमण मे जून २०१९


बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्र बदलत आहे. आभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व मूल्यमापन पद्धती बदलत आहे. शिक्षण संक्रमण या माध्यमातून पाठ्यपुस्तक मंडळ, परीक्षा मंडळ, शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज यांमध्ये आदानप्रदान व समन्वयाचे काम करत आहे. तसेच विविध शिक्षक अध्ययन अध्यापनात प्रयोगशीलता करताना दिसून येतात.  शिक्षण संक्रमण हे मासिक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येते. या मासिकामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारे बदल, मूल्यमापन पद्धतीमधील बदल, त्याबरोबर बदलत्या अभ्यासक्रमानुसार बदलत्या अध्यापन पद्धती याविषयीचे मार्गदर्शन केले जाते. शासनामार्फत व बोर्डामार्फत पारित केलेली परिपत्रके सूचना या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केल्या जातात शिक्षणक्षेत्र संदर्भ व्यक्ती व शिक्षक यांचे विविध विषयावरील व अध्यापन वरील लेख या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केले जातात.

अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करत असताना शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात त्याबरोबरच प्रयोगशीलता, अनुभव इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरू शकते यासाठी विचारांचे आदान-प्रदान होणे गरजेचे असते व कार्य शिक्षण संक्रमण या माध्यमातून करण्यात येते. 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या शिक्षण संक्रमणया मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत  Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

शिक्षण संक्रमण  मे  जून   २०१९    

इतर महिन्याचे शिक्षण संक्रमण मिळवण्यासाठी खालील लिंक ला जावून Download करू शकता.

                                                                              

  


स्कूल प्रशासन


संगणकप्रणालीचे नाव: स्कूल प्रशासन.    
संगणकप्रणाली स्वयंचलित भाषा: Marathi, Hindi, English.
Version: 3.4.90   
 Input Tool: Google Marathi Input Tool.
--------------------------------------------------------------------------
School Prashasan, Pune.                
Contact: +91-9545005395. 
Official Email: schoolprashasan@gmail.com.                          
URL: www.microdatacare.com.


‘स्कूल प्रशासन’ या मराठी संगणकप्रणालीद्वारा आपण आपल्या शाळेतील कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत, बिनचुक तसेच सुबक पद्धतीने करता येईल.
सदरहू संगणकप्रणालीद्वारा आपण प्रत्येकी शैक्षणिक वर्षनिहाय सर्व माहितीचे व्यवस्थापन करू शकतो. तसेच शैक्षणिक वर्षनिहाय क्षणार्धात आपण विविध माहितीची बिनचुक आकडेवारी,विविध अहवाल(रिपोर्ट्स) यांचे छायांकित प्रतिमध्ये (Printed) रुपांतर करून सदरहू अहवाल अगदी कमीत कमी वेळेत संबंधित अधिकारी,कार्यालय अथवा शालेय कामकाजासाठी उपयोगात आणता येवू शकतो.
संगणकप्रणालीमध्ये अंतर्भूत केलेल्या बाबी :

१. व्यवस्थापन:
१.१: इयत्ता व तुकडी :
इयत्ता व तुकडी यांचे व्यवस्थापन आपणास करता येते, कि ज्यामुळे आपण प्रवेश अर्ज नोंदविताना प्रत्येक विद्यार्थ्याचे व्यवस्थापन इयत्ता व तुकडी निहाय करता येते व त्यामुळे आपण सहजपणे इयत्ता व तुकडीनिहाय विविध माहिती ताबडतोब मिळविणे शक्य होते.

१.२: इयत्तानिहाय विषय व्यावस्थापन :
संबंधित इयात्तेनिहाय विषयांचे व्यवस्थापन करणे सहज व सोपे आहे कि जेणेकरून विषयनिहाय शिक्षक व तासिका यांचा मेळ अगदी सहजगत्या साधणे शक्य होईल.

१.३: संवर्ग,धर्म व जात व्यावस्थापन :
विद्यार्थी प्रवेश अर्ज नोंदविताना प्रत्येक विद्यार्थ्याचे संवर्ग,धर्म व जात यांची माहिती नमूद करणे अनिवार्य आहे त्यामुळे त्याचे व्यवस्थापन संगणकप्रणालीद्वारा करता येते कि ज्यामुळे आपणास संवर्ग,धर्म व जात निहाय विद्यार्थ्यांची एकुणात,विद्यार्थी यादी,इयत्ता व तुकडी मधिल संवर्ग,धर्म व जात निहाय विद्यार्थी यादी अगदी बिनचुक व चटकन शैक्षणिक वर्षनिहाय प्राप्त होईल.

१.४: पोषणआहार स्वयंचलित इयत्ता निवडणे :
विद्यार्थी हजेरी नोंद होताक्षणी आपोआप (Auto Mode) द्वारा पोषण आहार नोंदी करावयाच्या असतील तर संबंधित सेटिंग करता येते.

१.५: शाळेची माहिती:
संबंधित शाळेची संपूर्ण माहिती नमूद करणे अनिवार्य आहे, कि त्याआधारे प्रत्येक अहवाल (रिपोर्ट) वरती शाळा,संस्था,शाळा/संस्था स्थापना दिनांक, शाळा/संस्था बोधवाक्य इ. माहितीचा उल्लेख होतो.

१.६: वापरकर्ता माहिती:
संबंधित पर्यायाद्वारे आपण Login असलेल्या वापरकर्त्याच्या Login Details मध्ये बदल करू शकतो.
कि जसे वापरकर्ता नाव (User Name),संकेतांक (Password) इ. माहितीमध्ये (User Account Details) काही बदल करू शकतो.

१.७: डेटाबेस व्यवस्थापन:
संगणकप्रणालीद्वारा संग्रहित केलेल्या माहितीचा डेटाबेस पूर्णत: सुरक्षित ठेवण्याची सोय उपलब्ध केलेली आहे.कि ज्याद्वारा आपण आपल्या डेटाबेस चा Backup कधीही,कोणत्याही स्टोरेज साधनांवरती (उदा. Hard Disk.. Drive,Pen Drive etc.) चालू दिनांक व वेळ यानुसार घेऊ शकतो, कि जेणेकरून आपला डेटाबेस पूर्णपणे व्यवस्थित व सुरक्षित राहण्यास मदत होईल.

१.८: कॅटलॉग वर्ष बदल:
संबंधित पर्यायाद्वारे चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेश नोंदविलेले विद्यार्थी नविन (पुढील) शैक्षणिक वर्षामध्ये एका Click वरती परावर्तित (Cariforward) करता येतात.

२. विद्यार्थी प्रवेश:
२.१: प्रवेश अर्ज नोंदविणे (विद्यार्थी नोंदी करणे):
नविन विद्यार्थी नोंद करणे,नोंद केलेल्या विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये बदल करणे अथवा नोंद खोडणे (Delete) इत्यादी बाबी प्रवेश अर्जाद्वारा करता येणे शक्य आहे.

२.२: कॅटलॉगवरती विद्यार्थी पूर्ववत/कमी करणे:
संबंधित शैक्षणिक वर्षामधील विद्यार्थ्याच्या कॅटलॉग वरील नोंदीमध्ये बदल करता येणे शक्य आहे.
म्हणजेच चालू शैक्षणिक वर्षातील संबंधित इयत्तेतील विद्यार्थी/विद्यार्थिनी चालू कॅटलॉग (पटावरून) पूर्ववत (नाव कमी केलेले) अथवा नाव कमी करता येते.

२.३: शैक्षणिक वर्ष दुरुस्ती:
उदा.:  शैक्षणिक वर्ष  २०१२-२०१३ मधिल ‘राधिका पाटील’ या विद्यार्थिनीचे मूळ शैक्षणिक वर्ष २०१०-२०११ आहे परंतु काही कारणास्तव सदरहू नोंद चुकीच्या शैक्षणिक वर्षात नोंदविली गेलेली आहे परंतु आपल्या संगणकप्रणालीद्वारा अगदी काही क्षणात संबंधित विद्यार्थी नोंद सुधारून घेवू शकतो. 

२.४: रिपोर्ट:
१. जनरल रजिस्टर.
२. बोनाफाईड.
३. शाळा सोडल्याचा दाखला.
४. निर्गम उतारा.
५.संवर्गानुसार रिपोर्ट.
६.लिंगानुसार रिपोर्ट.
७.Enrollment रिपोर्ट (इयत्ता व तुकडी निहाय चालू शैक्षणिक वर्षातील एकुण मुले व मुली).
८.संवर्गा व इयत्तेनिहाय रिपोर्ट.
९.प्रवेशअर्ज रिपोर्ट.

३. विद्यार्थी हजेरी:
३.१: कॅटलॉग तयार करणे:
इयत्ता व तुकडीनिहाय कॅटलॉग तयार करता येणे सहज शक्य आहे. जसे कि सर्वप्रथम मुले,मुली अथवा इतर पर्यायानिहाय कॅटलॉग तयार करण्याची सोय संगणकप्रणालीद्वारा केली गेली आहे.

३.२: विद्यार्थी हजेरी:
इयत्ता व तुकडीनिहाय दैनंदिनी हजेरी नोंदविता येते कि सदरहू हजेरीद्वारा आपोआप (Auto Mode) दैनंदिन पोषण आहार नोंदविला जातो.

३.३: रिपोर्ट:
१. विद्यार्थी यादी.
२. उपस्थिती पत्रक (रिक्त उपस्थिती पत्रक देखील उपलब्ध आहे).

४. शिक्षक माहिती:
४.१: शिक्षक माहिती:
संबंधित शाळेतील शिक्षक यांची माहिती सदरहू संगणकप्रणालीद्वारा संग्रहित करता येते. शिक्षक वैयक्तिक माहिती,शैक्षणिक पात्रता माहिती,व्यवसायिक पात्रता माहिती,भविष्यनिर्वाह निधी संबंधित माहिती,नोकरी चालू दिनांक,चालू जिल्हा व तालुका रुजू माहिती,अनुभव,पगार संबंधित माहिती,धारण केलेले पद इ.

४.२: शिक्षक हजेरी:
दैनंदिन शिक्षक हजेरी नोंदविण्याची सोय संबंधित संगणकप्रणालीमध्ये केलेली आहे.

४.३: शिक्षक व्यवस्थापन:
संबंधित इयत्ता व तुकडीनिहाय विषय शिक्षक तसेच संबंधित वर्ग शिक्षकांचे व्यवस्थापन करता येते.

४.४: रिपोर्ट:
१. शिक्षक हजेरी.
२. शिक्षकनिहाय वैयक्तिक माहिती.

५. शालांत परिक्षा:
५.१: परीक्षेचा प्रकार व परीक्षा नाव:
शालांत परिक्षा नियमानुसार परीक्षा प्रकार व नाव नोंदविण्याची सोय उपलब्ध आहे कि जेणेकरून परीक्षा प्रकारा व नावनिहाय विषयांचे एकुण गुण व श्रेणी यांचे मुल्यांकन अगदी सहजगत्या करता येते.
५.२: श्रेणी माहिती:
संबंधित विषयनिहाय व गुणदान या दरम्यान श्रेणी मानांकन समयोजित करता येते कि जेणेकरून विद्यार्थी विषयनिहाय अहवाल , प्रगतीपत्रक इ. वरती आपोआप श्रेणी मुल्यांकन होण्यास मदत होते.
५.३: विषयांचे मार्क(गुण):
संबंधित विषयनिहाय एकुण गुण यांची बिनचुक नोंद करता येते कि जेणेकरून त्याचा संबंध थेट विद्यार्थ्याचे विषयनिहाय प्रगतीपत्रक नोंद करताना येतो.

५.४: प्रगतीपत्रक:
संबंधित विषयनिहाय तसेच विद्यार्थीनिहाय एकुण प्राप्त गुण यांची नोंद करता येते कि जेणेकरून संगणकप्रणालीद्वारा परीक्षा संबंधित वेगवेगळे रिपोर्ट्स सहजतेने उपलब्ध होण्यास मदत होते.

५.५: रिपोर्ट:
१. मूल्यमापन नोंदणीपत्र रिपोर्ट.
२. वर्गनिहाय परीक्षा रिपोर्ट.
३. विषयनिहाय परीक्षा रिपोर्ट.
४. वार्षिक प्रगतीपत्रक रिपोर्ट.

५.६: स्पर्धा परीक्षा योजना:
चालू शैक्षणिक वर्ष व विविध स्पर्धा परीक्षानिहाय आकडेवारी नोंदविता येते.

५.७: रिपोर्ट:
१. स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक वर्षनिहाय रिपोर्ट.

६. नोंदवही:
६.१: आवक रजिस्टर (In word Register):
शाळा/संस्था मध्ये आवक (खरेदी,देणगी इ.) होणाऱ्या मालमत्तेची नोंद आवक रजिस्टरद्वारा चालू आर्थिक वर्षनिहाय करता येते.

६.२: जावक रजिस्टर (Out word Register):
शाळा/संस्था मध्ये असणाऱ्या मालमत्तेची जावक नोंद (विक्री,देणगी,दान इ.) होणाऱ्या मालमत्तेची नोंद जावक रजिस्टरद्वारा चालू आर्थिक वर्षनिहाय करता येते.

६.३: साठा रजिस्टर (Stock Register):
शाळा/संस्था मध्ये असणाऱ्या मालमत्तेचा घसारा, खरेदी,विक्री इ. बाबींची नोंद साठा रजिस्टर द्वारा चालू आर्थिक वर्षनिहाय करता येते.

६.४: रिपोर्ट:
१. आवक रिपोर्ट (रजिस्टर).
२. जावक रिपोर्ट (रजिस्टर).
३. साठा/Ded Stock रिपोर्ट (रजिस्टर).
४. साठा रिपोर्ट (रजिस्टर).

६.५: मनिऑर्डर/चेक/बँक ड्राफ्ट स्वीकृती रजिस्टर:
शाळा,संस्था यांना मनिऑर्डर/चेक/बँक ड्राफ्टच्या स्वरूपात प्राप्त होणाऱ्या निधीची नोंदणी चालू आर्थिक वर्षनिहाय सदरहू संगणकप्रणालीद्वारा करता येते.

६.६: रिपोर्ट:
१. मनिऑर्डर/चेक/बँक ड्राफ्ट स्वीकृती रिपोर्ट (रजिस्टर).
६.७: किरकोळ रजा रजिस्टर:
शिक्षकांच्या रजा नोंदविणे अगदी सोप्या पद्धतीने सदरहू संगणकप्रणालीमध्ये मांडले आहे. कि त्याचा परिणाम (effect) पूर्णतः शिक्षक हजेरी वरती होतो.

६.८: रिपोर्ट:
१. किरकोळ रजा रिपोर्ट (रजिस्टर).

६.९: फिरती रजिस्टर:
शिक्षक फिरती हालचाल रजिस्टरची नोंद सदरहू संगणकप्रणालीमध्ये करणे सहज शक्य आहे.

६.१०: रिपोर्ट:
१. फिरती रजिस्टर रिपोर्ट (रजिस्टर).

६.११: Upload Images Files:
शाळा,संस्था,शासन संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज जतन करता येवू शकतात तसेच गरजेवेळी ताबडतोब व सहजगत्या शोधून ते उपयोगात आणता येवू शकतात.

७. शासकीय योजना:
७.१: मोफत पाठ्यपुस्तक वितरण रजिस्टर:
पुस्तके,वह्या,स्टेशनरी इ.
१: मोफत पाठ्यपुस्तक वितरण रिपोर्ट(रजिस्टर).

७.२: साहित्य वाटप रजिस्टर:
फुटपट्टी,गणवेश इ.
१: साहित्य वाटप रिपोर्ट(रजिस्टर).

७.३: विविध शिष्यवृत्ती योजना रजिस्टर:
सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ दत्तक योजना,अहिल्यादेवी होळकर योजना इ.
१: विविध शिष्यवृत्ती योजना रिपोर्ट(रजिस्टर).

८. रोजकिर्द (कॅश बुक): 

८.१: कॅश बुक (किर्द) खाते माहिती:
रोजकीर्दीसाठी व्यवहार करण्यासाठी लागणारे खाते नाव,लेजर हेड,लेजर सब हेड यांची नियमित यादी सदरहू पर्यायाद्वारा तयार करता येते.

८.२: किर्दनिहाय आरंभीची शिल्लक (आर्थिक वर्षनिहाय):
प्रत्येक किर्दचे (खाते) मागील वर्षातील शिल्लक रक्कम (रोख,बँक रक्कम) यांची नोंद करणे अनिवार्य आहे , यासाठी सदरहू संगणकप्रणालीद्वारा किर्दनिहाय सुरुवातीची शिल्लक नोंदविता येते.

८.३: दैनंदिन व्यवहार:
दैनंदिनी होणाऱ्या व्यवहारांची नोंद अगदी सहजगत्या सदरहू पर्यायाद्वारा केली गेली आहे.

८.४: रिपोर्ट:
१. लेजर रिपोर्ट.
२. Ledger- खाते बुक रिपोर्ट.
३. मुख्य किर्द वही रिपोर्ट .
४. रोजकिर्द रिपोर्ट.
५. जमा-नावे पत्रक रिपोर्ट.
६. चेक/धनादेश वितरण रजिस्टर रिपोर्ट.

९. सर्वेक्षण (जन गणना): 
९.१: धर्म/प्रवर्गनिहाय जात माहिती:
९.२: कुटुंबप्रमुखांची माहिती:
९.३: कुटुंब सदस्यांची माहिती:
९.४: रिपोर्ट:


१०.  पोषणआहार: 
१०.१: इयत्तेनिहाय पोषण आहार दरपत्रक:
१०.२: पोषण आहार अखेरची शिल्लक:
१०.३: दैनंदिन पोषण आहार नोंदी:
१०.४: मासिक पोषण आहार नोंदी:
१०.५: मासिक पोषण आहार रिपोर्ट्स:
१०.६: मासिक पोषण आहार उपयोगिता रिपोर्ट्स:
 
११. मदत: 
१२. Services (सेवा):
१२.१: इमेल्स सेवा:
१२.२: एस.एम.एस. सेवा:
१२.१: Connect via Live Support:
१. via Teamviewer Remote Version :
२. via Anydesk :

१३. बाहेर:

स्कूल प्रशासन  शालेय व्यवस्थापन संगणक प्रणालीची माहिती PDF  स्वरूपात प्राप्त करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा .... 


School Prashasan, Pune.                
Contact: +91-9545005395. 
Official Email: schoolprashasan@gmail.com.                          
URL: www.microdatacare.com.











   


MH-GK : General Knowledge for Sainiki Schools in Maharashtra

MH-GK: General Knowledge for Sainiki Schools in Maharashtra
                    महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सैनिकी शाळा स्थापन करण्यात आलेली आहे. या सैनिकी शाळेचे चा उद्देश
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA साठी मुलांची पूर्वतयारी करणे हा आहे. यासाठी त्यांच्या दैनिक अभ्यासक्रमांमध्ये सैनिकी प्रशिक्षण व अकरावी, बारावी साठी जनरल नॉलेज GK म्हणजेच सामान्य ज्ञान हा विषय अभ्यासासाठी ठेवण्यात आलेला आहे. 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे. यांच्या वतीने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी व शिक्षकांसाठी MH-GK : General Knowledge for Sainiki Schools in Maharashtra. या ब्लॉगवर नोट्स, प्रश्नपत्रिका व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा…

                        वास्तविकतः सामान्य ज्ञान हा विषय खूप व्यापक स्वरूपाचा आहे. सध्याच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात सामान्य ज्ञान या विषयास अनन्य साधारण महत्व आहे. एवढेच नव्हे तर व्यक्तिमत्व विकासात व प्रभावी व्यक्तिमत्व विकसित करताना सामान्य ज्ञानाचा आभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुषंगाने सदरील वेबसाईटवर सामान्य ज्ञान या विषयाशी निघडीत साहित्य प्रकाशित करण्यात येते. याचा उपयोग सर्व सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांना होणारच आहे. त्या बरोबरच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA  च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्यानाही होणार आहे.