Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

शिक्षण संक्रमण मध्ये लेख प्रकाशीत करणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित  शिक्षण संक्रमण या मासिकामध्ये लेख प्रकाशित करण्यासाठी खालील प्रक्रिया करावी. 

शिक्षण संक्रमण साठी लेख कोण पाठवू शकतो:

विद्यार्थी, पालक व शिक्षकांना साहित्य पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे  यांच्या कडून करण्यात येत आहे.

साहित्य कसे असावे :

१.               शिक्षकांनी शालेय विषयाशी निगडीत, विद्यार्थी व शिक्षकांना प्रगल्भ करणारे, त्यांचा गुणात्मक विकास करणारे आपले स्वलिखित साहित्य अंकासाठी पाठवावे.

२.               पुनर्रचित अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धती, विषयनिहाय पाठ्यपुस्तकातील आशय, अध्यापन पद्धती, शालेय उपक्रम या विषयांवर आपले विचार व्यक्त व्हावेत. अर्थात याशिवाय शिक्षक व विद्यार्थी यांचे शालेय हित लक्षात घेऊन शैक्षणिक विषयावर लेख पाठवावेत.

३.               लेख हा स्वयं लिखित असला पाहिजे तो वाङमयचौय असता कामानये.

४.               लेखामध्ये आक्षेपार्ह मजकूर तसेच कोणत्याही प्रकारे व्यक्ती, ऐतिहासिक घटना, जात, धर्म, पंथ, शासन, जातीभेद, वर्णभेद, समूह भावना या संदर्भात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीत्या आक्षेप सूचित होईल किंवा अनादर दर्शविला जाईल अशा स्वरूपाची माहिती किंवा मजकूर समाविष्ट असणार नाही.

५.               लेखातील मते व आशय बाबत सर्व अधिकार लेखकाचे राहतील.

६.               लेख यापूर्वी कोठेही छापला गेलेला नसला पाहिजे.

वरील प्रकारच्या सर्व लेखांचे शिक्षण संक्रमण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत स्वागतच होईल. ते ‘शिक्षण संक्रमण’ च्या अंकात प्रकाशित केले जाईल. तसेच आलेल्या लेखातून निवडक लेखांवर, संपादक मंडळाकडून आवश्यक ते संस्कार करूनच लेख प्रकाशित केले जातील, याची लेखकांनी नोंद घ्यावी.

लेख देण्यासाठीची प्रक्रिया:

  शिक्षण संक्रमण मध्ये लेख देण्यासाठी येथे   क्लिक करा .......

१.               लिंकला क्लिक केल्यानंतर शिक्षण संक्रमण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचा  फॉर्म उघडेल या फॉर्म मधील सर्व माहिती भरावी.

२.               लेखकाचे हमीपत्र / संमती पत्र भरून त्यावर स्वाक्षरी करून त्याचा फोटो काढून अपलोड करावा लागेल. 

३.               आपला लेख सॉफ्ट कॉपी Soft Copy मध्ये असावा.

४.               लेखाची फॉन्ट font यासोबत आपल्याला अपलोड करावयाची आहे. 

५.               ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर submit बटनावर क्लिक करावे.

६.               आपला लेख  शिक्षण संक्रमण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे. यांना प्राप्त होईल. व तो सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकाशित होईल.  

लेखकाचे हमीपत्र / संमती पत्र नमुना डाउनलोड करण्यासाठी     येथे क्लिक करा.  

कार्यालयास संपर्क:

शिक्षण संक्रमण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कार्यालयास संपर्क करण्यासाठी   येथे क्लीक करा. याबरोबर एक संपर्क फॉर्म उघडेल आपले नाव ईमेल फोन भरून आपला मेसेज लिहून पाठवावा.   

 शिक्षण संक्रमण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचा पत्ता:

पत्ता:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

सर्व्हे नं. 832-, फायनल प्लॉट क्रमांक 178 179,

बालचित्रवाणी जवळ, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे,

भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे-411 004. महाराष्ट्र (भारत)

 फोन: 020-2570500

 ई-मेल: shikshan.sankraman@gmail.com

 

   

No comments: