Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षा आवेदनपत्र ( Hall ticket )

New  
५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षा आवेदनपत्र ( Hall ticket ) वेबसाईट वर उपलब्ध झाले आहे.
इयत्ता ५ वी व ८ वी साठी १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परिक्षा होणार आहे .
त्यासाठी विद्यार्थी परिक्षा आवेदनपत्र वेबसाईट वर उपलब्ध  झालेले आहेत.
सर्वप्रथम खालील वेबसाईट login करा.


Click here to LOGIN

नंतर school login करून विद्यार्थी यादी ओपन होईल.विद्यार्थ्यांच्या नावापुढे Admit card पर्याय आहे .त्याला click केल्यावर परिक्षा आवेदनपत्र ओपन होईल.

त्यामध्ये वरील बाजूस print option आहे.

त्याला click करून print काढता येईल.

विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी सुचना.


सुुचना


परीक्षार्थ्यांसाठी.

1) परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपर सुरु होण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर परीक्षागृहात प्रवेशपत्रासह उपस्थित रहावे.

2) उत्तरे नोंदविण्यास सुरवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर आणि प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर छापलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

3) उत्तरपत्रिकेवर आणि स्वाक्षरीपटावर विहित ठिकाणी प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षार्थ्याने स्वाक्षरी करावी.

4) प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत इतर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, केंद्रसंचालक यांचेशी पेपर चालू असताना चर्चा करू नये.

5) कॅलक्युलेटर, मोबाईल, पुस्तके, इ. साहित्य परीक्षागृहात आणण्यास सक्त मनाई आहे.

6) उत्तरे नोंदविण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करावा.

7)  परीक्षार्थ्यास कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येणार आहे. पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिकेची Original Copy पर्यवेक्षकाकडे जमा करून उत्तरपत्रिकेची Candidate Copy व प्रश्नपत्रिका आपल्या सोबत घेऊन जाण्यास परीक्षार्थ्यास परवानगी आहे.

8) कार्बनलेस उत्तरपत्रिकेवरील बैठक क्रमांकाच्या रकान्यात परीक्षार्थ्याचा बैठक क्रमांक छापण्यात आलेला नाही. तथापि उत्तरपत्रिकेवरील बारकोड क्रमांक हाच त्याचा बैठक क्रमांक आहे.

9) उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थ्याचा बैठक क्रमांक, माध्यम, सेमी इंग्रजी व प्रश्नपत्रिका संचकोड अचूकपणे नोंदवून त्याबाबतची वर्तुळे अचूकपणे रंगविणे आवश्यक आहे.

10) उत्तरपत्रिका संगणकावर तपासली जाणार असल्याने ती फाटणार नाही चुरगळणार नाही याची दक्षता घ्यावी.

11) उत्तरपत्रिका फाटल्यामुळे उत्तरपत्रिकेवर रंगविलेले पर्याय दिसत नसल्यास त्या प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत.

शाळा व पालकांसाठी सूचना :-

1) परीक्षेपूर्वी परीक्षार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा पुरेसा सराव करून घ्यावा.

2)प्रश्नपत्रिकेत त्रुटी/चुका आढळून आल्यास त्याबाबतचे निवेदन लेखी स्वरुपात न पाठवता संबंधित शाळेच्या लॉगीनमधून तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीनेच करावे.

3) परीक्षेनंतर निकालाच्या कार्यवाहीचे टप्पे :- अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करणे -> आक्षेप मागवून अंतिम उत्तरसूची घोषित करणे -> अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित करणे > त्यावर आक्षेप मागवून अंतिम निकाल व गुणवत्ता यादी घोषित करणे.

4)परीक्षा परिषदेच्या www.puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केलेली माहिती व सूचना नियमितपणे काळजीपूर्वक वाचाव्यात.

5) अनावश्यक पत्रव्यवहार अथवा अनावश्यक ईमेल्स परिषदेस पाठवू नयेत.

6 ) परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत प्रवेशपत्र जतन करून ठेवावे.

No comments: