Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

सहशालेय उपक्रम



सहशालेय उपक्रम:






शिक्षण व्यवस्थेचा विचार करताना भारतीय शिक्षण संकल्पनेत शिक्षणाला अनन्य साधारण महत्व देण्यात आलेले आहे. तर “आचार्य देवो भव” या उक्तीन्वये शिक्षकांना देवापेक्षाही मोठे स्थान निर्माण करून देण्यात आलेले आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांणी‘शिक्षण हे वाघीनेचे दूध आहे आणि ते प्रशणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी शिक्षणाची महती वर्नविलेली आहे.
शिक्षणासंबधीची थोर विचारवंतांची मते विचारात घेताना शिक्षण व शिक्षण प्रक्रियेची खोली व व्यापकता आपल्या ध्यानात येते.
ऋग्वेदानुसार मानवाला जे स्वावलंबी व निस्वार्थी बनवते ते म्हणजे शिक्षण होय. तर शंकराचार्य  आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कारात शिक्षण असल्याचे सांगतात.
स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती, शिक्षणतज्ञ व हाडाचे शिक्षक म्हणून ख्याती असलेले डॉं. राधाकृष्णन सांगतात लोकशाहीनिष्ठ शिक्षण म्हणजे लोकांना केवळ साक्षर करणे नव्हे किंवा त्यांना एखाद्या व्यवसायात तरबेज करणे नव्हे, तर त्यापेक्षा काही अधिक आहे, ते म्हणजे मनाचे औदार्य. मानव प्राण्याविषयी आदर व एकसंघ राहण्याचे कौशल्य होय, यातूनच मानवी हृदयाला सौंदर्य प्राप्त होते.
उच्च प्रतीचे शिक्षण म्हणजे जे केवळ माहितीच दॆने नाही, तर सर्व चराचर सृष्टीशी आपल्या जीवनाचा मेळ घालून देते. अशी शिक्षणाची मर्मभेदी व्याख्या रवींद्रनाथ टागोर करताना दिसून येतील.
वरील सर्व शिक्षणाच्या व्याख्यांचा अभ्यास करताना असे ध्यानात घ्यावे लागेल कि, शिक्षण म्हणजे केवळ चार भिंतीच्या आत राहून, ठरलेल्या वेळात, दिलेले पुस्तक शिकवणे नव्हे तर बदलत्या जगात स्वावलंबी बनवत आत्मसाक्षात्कार निर्माण करणे, समाजात माणूस म्हणून राहण्यासाठी तयार करणे. तसेच केवळ माहितीवर चालणारा किंव्हा पोपटपंची करणारा शिष्य बनवणे नव्हे तर सजीव सृष्टीशी मिळतेजुळते करून देण्याची क्षमता निर्माण करणे असा अर्थ अभिप्रेत आहे.       
सजीव सृष्टीचा इतिहास जर आपण लक्ष्यपुर्वक पहिला तर आपणास समजेल कि, डायनासूर नावाचा एक बलाढ्य प्राणी अस्तित्वात होता. आणि तोच त्या काळातील सर्वात शक्तिमान प्राणी असावा. मात्र आज त्याचे अस्तित्व इतिहासजमा झाले आहे. याचे कारण शोधायचे झाले तर आपणास असे नमूद करता येईल कि, या जगात जिवंत राहण्यासाठी केवळ ताकद महत्वाची नाही तर सजीवसृष्टीशी मिळते जुळते होण्याची गरज आहे. म्हणजेच केवळ शरीराने मानव तयार होणे नैसर्गिक क्रिया आहे; मात्र मन व आत्मा याने मानव तयार करणे हि जवाबदारी शिक्षण प्रक्रियेकडे असल्याचे नमूद करणे अभियोग्य राहील.    
त्याच्या ही पुढे जाऊन स्वामी विवेकानंद म्हणतात केवळ डोक्यात माहिती भरने म्हणजे शिक्षण नाही तर मानवामध्ये दैवी विचारांचे प्रकटीकरण करणे होय. माणसाला मानव बनविणे व त्यात दैवी गुण भरणे असे उपयोजन शिक्षणात असावे.
भारतीय शिक्षण व्यवस्थेचा इतिहास जर पहिला तर आपणास दिसेल की गुरूच्या आश्रमात जावून शिष्याला शिक्षण घ्यावे लागत असे. गुरु जी कामे सोपवतील ती सर्व शिष्याला पूर्ण करावी लागत असत. एखादा राजपुत्र असला तरी त्याला कोणत्याही प्रकारचे वेगळेपण नव्हते. त्यालाही युद्धकालांबरोबर इतर सर्व प्रकारची कार्ये किंवा कला अवगत करून घेणे अभिप्रेत होते. संगीतकला, नृत्यकला, गायन कला, व्यापार ज्ञान, कृषी ज्ञान वेदाभ्यास,याप्रकारच्या सर्व क्षेत्रांचा अभ्यास करावा लागत असे. एवढेच काय त्याला भिक्षाही मागावी लागत असे.जेणेकरून एक सर्वजाण व सर्वगुणसंपन्न असा जाणता राजा प्रजेसाठी उपलब्ध करून देणे शक्य होईल. म्हणजेच पुरातनकालीन शिक्षण व्यवस्था हि शिष्याच्या सर्वांगीण विकासावर आधारलेली होती.
त्यामुळेच केवळ पुस्तकी ज्ञान देणे म्हणजे शिक्षण होत नाही तर महात्मा गांधीजींच्या विचाराप्रमाणे   शिक्षण म्हणजे बालकाच्या शरीर, मन, व आत्मा यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे होय. याचाच अर्थ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधने म्हणजे शिक्षण होय. आणि हा सर्वांगीण विकास केवळ पाठ्यपुस्तकात पूर्ण होण्यास काही मर्यादा प्राप्त होतात. या मर्यादा सह शालेय उपक्रमातून पूर्ण करणे शक्य होऊ शकते. म्हणून सद्य पाठ्य पुस्तकात व पाठ्यांशात सहशालेय उपक्रमांचे महत्व अतुलनीय आहे.

सहशालेय उपक्रमांचे स्वरूप / व्याप्ती :


सद्य शिक्षण व्यवस्था ही बालककेंद्रित आहे. व या शिक्षण व्यवस्थेचे शाळा शिक्षक, समाज पालक हे महत्वपूर्ण पैलू आहेत. त्यामुळे सहशालेय उपक्रम योजिताना खालील घटकांचा विचार करणे रास्त ठरेल.
1.     विद्यार्थी
2.     शालेय व्यस्थापन –शिक्षक व शाळा
3.     पालक
4.     समाज

१. विद्यार्थी :-
विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे; त्याचा सर्वांगीण विकास व्हावा हा मुख्य उद्देश ध्यानात ठेवून. सर्व शालेय व सहशालेय उपक्रम आयोजित करणे महत्वपूर्ण ठरते.हे करताना सहशालेय उपक्रमांनमध्ये सर्व विध्यार्थ्यांचा सहभाग असणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे सहशालेय उपक्रमांचे शालेय स्तरावर बांधणी करताना विद्यार्थी विकास हेव उद्दिष्ट ध्यानात ठेवायला हवे.
२. शिक्षक:-
शालेय शिक्षण विभागाचा दुसरा महत्वाचा दुवा म्हणजे शिक्षक होय. शिक्षक जर परिपूर्ण असेल तर तो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधू शकतो. कोणताही माणूस पूर्ण पणे परिपूर्ण असू शकत नाही. जर एखादा  माणूस वा शिक्षक  स्वतःला परिपूर्ण समजत असेल तर तो कल्पनेच्या विश्वात रममाण आहे असे समजावे. शिक्षकांनी स्वतःला एकदा विश्वकोश व सर्वगुण संपन्न न समजता विद्यार्थी समजने आत्यावशक आहे.शिक्षकांचा स्वयं विकास साधण्याची संधी सहशालेय उपक्रमांतून शक्य होऊ शकते. यातून शिक्षकांना स्वतःचा विकास व पर्यायाने विद्यार्थ्यांचा विकास साधने शक्य होऊ शकते. त्यामुळे काही सहशालेय उपक्रम शिक्षकांसाठी राबविणे गरजेचे आहे.    
३. पालक :
शाळा ही केवळ पालकांच्या विश्वासावर चालत असते, त्यामुळे पालकांचा विश्वास जिंकणे, त्यांमध्ये आपुलाकीची व सहकार्याची भावना जागृत करणे, व पाल्य कल्याण जोपासण्यासाठी काही सहशालेय उपक्रम पालकांना ध्यानात धरून आखण्याची गरज असते, जेणेकरून शिक्षण व्यवस्थेमध्ये पालकांचा सहभाग वाढावा व शैक्षणिक उद्दिष्ठ जोपासावे.
        ४. समाज:
          मानव हा समाजशील प्राणी आहे. बालकाच्या शिक्षणाची खरी सुरुवात माता-पिता व कुटुंबानंतर समाजातच होत असते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला समाजातच कार्यरत व वावरावे लागते, त्यामुळे त्याच्या सामाजिक पैलूंचा विकास होणे, सामाजिक स्थितीची जाण असणे गरजेचे असते. त्यामुळे शाळेतील सहशालेय उपक्रम तयार करताना किंवा मांडणी करताना समाजाचा विचार करणे महत्वाचे आहे.     
          सहशालेय उपक्रमांमध्ये  अश्या कृतींचा अंतर्भाव होणे आवश्यक आहे, ज्यांमुळे शैक्षणिक उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, पालक विश्वास, सामाजिक भान,शिक्षक विकास इ. उद्दिष्टे पूर्णत्वाला नेणे शक्य होईल. त्यामुळे सहशालेय उपक्रमांची बांधणी उपक्रमशिलतेतूण व गरजेनुसार करणे योग्य ठरते.
          प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळेत गरजेनुसार वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबविणे क्रमप्राप्त ठरते.
          त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळेतील उपक्रमांची विभागणी होणे गरजेचे आहे.
          सहशालेय उपक्रम शाळेत राबविण्यापाठीशीचा उद्देश हा सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधने हा असल्याने शिक्षण कार्यांत येणाऱ्या सर्वांची संघकृती आहे. एखाद्याने या कार्यात केलेली टाळाटाळ ही सर्वांची हानी ठरू शकते. यामुळे सर्वसाहाभाग व समन्वय असणे गरजेचे आहे.







शालेय उपक्रम यादी:
गरज व संविधानात ध्यानात घेवून सह शालेय उपक्रमांची प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा स्थलनिहाय विभागणी खालीलप्रमाणे होवू शकते.
          १. प्राथमिक शाळेत राबविण्यासाठीचे सहशालेय उपक्रम  
२. माध्यमिक  शाळेत राबविण्यासाठीचे सहशालेय उपक्रम
३. उच्च माध्यमिक शाळेत राबविण्यासाठीचे सहशालेय उपक्रम




अ.क्र.
सहशालेय उपक्रम
१      
नवागतांचे स्वागत/ प्रवेसोत्सव
वैयक्तिक स्वच्छता
जो दिनांक तो पाढा
इंग्रजी वर्तमानपत्र
गृहपाठ तपासणी पथक
वर्ग सजावट
मोठ्यांनी लहानांचा आभ्यास घेणे
शब्दांच्या भेंड्या
टाकावू पासून टिकावू
१०
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
११
बाल आनंद मेळावा
१२
वाढदिवस साजरा करणे
१३
मराठी, हिंदी, इंग्रजी परिपाठ
१४
अनुभव कथन सोहळा
१५
रांगोळी सुशोभन ( फुले, दगड, पाने )
१६
वक्तृत्व स्पर्धा
१७
चित्रकला स्पर्धा
१८
चित्रकला प्रदर्शन
१९
निबंध लेखन
२०
उपस्तिथी सन्मान
२१
बुद्धिबळ स्पर्धा
२२
खेळाद्वारे पाठांतर
२३
प्रश्नोत्तराचा तास
२४
वाचाल तर वाचाल
२५
शैक्षणिक तक्ते
२६
योगासने
२७
लेझीम सादरीकरण
२८
काव्य वाचन
२९
गायन स्पर्धा
३०
बँड पथक
३१
फॅन्सी ड्रेस स्पर्धा
३२
नाट्यीकरण
३३
भेटकार्ड तयार करणे
३४
मातकाम
३५
शंकापेटी
३६
लोकवर्गणीतून शाळेचा विकास
३७
रक्षा बंधन
३८
विज्ञान प्रदर्शन
३९
आरोग्य शिबीर
४०
विशेष व्यक्तींच्या मुलाखती
४१
गावातील व्यावसायिकांना भेट
४२
क्रिडा स्पर्धा
४३
शैक्षणिक सहली ( ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रेक्षणिक, नैसर्गिक )
४४
क्षेत्र भेट ( ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रेक्षणिक, नैसर्गिक, भावनिक, व्यावहारिक ठिकाणी )
४५
स्वच्छता मोहीम
४६
हळदी कुंकू
४७
आदर्श माता पुरस्कार
४८
स्नेह संमेलन
४९
वृक्षारोपण
५०
प्रश्न मंजुषा
५१
महिला मेळावा
५२
क्षेत्र भेट
५३
श्रम संस्कार शिबीर
५४
सहभोजन
५५
लोकजागृती रॅली
५६
सांस्कृतिक पारितोषिक वितरण समारंभ
५७
अंधश्रद्धा निर्मुलन जनजागरण उपक्रम
५८
पथनाट्य
५९
विविध जयंती व पुण्यतिथी
६०
संगणक साक्षरता
६१
वाद विवाद स्पर्धा
६२
एकांकिका
६३
गणित प्रश्न मंजुषा
६४
पोस्ट ऑफिस भेट
६५
जैव तंत्रज्ञान  विभागास भेट
६६
असमानता निर्मुलन कार्यक्रम
६७
वयस्कांकडून मार्गदर्शन
६८
आपत्ती व्यस्थापन प्रात्यक्षिक
६९
आपत्ती व्यस्थापन मार्गदर्शन
७०
संविधान वाचन दिन
७१
वाचन प्रेरणा दिन
७२
युवा दिन आयोजन
७३
कथा कथन
७४
प्राणी संग्रहालयास भेट
७५
विषयनिहाय कार्यशाळा
७६
संस्कारक्षम व्याख्याने
७७
कॅम्प फायर
७८
रस्ता सुरक्षा सप्ताह
७९
रस्ता सुरक्ष मार्गदर्शनपर व्याख्यान
८०
व्यसन मुक्ती समुपदेशन
८१
लैगिकशिक्षण समुपदेशन
८२
भित्तीपत्रके
८३
समूहगान स्पर्धा
८४
आनंद नगरी
८५
मीना राजू मंच
८६
स्नेह भोजन
८७
हस्तकला  कार्यशाळा
८८
भाषण स्पर्धा
८९
असंबंद भाषण स्पर्धा
  
सैनिकी शाळेसाठी  :                               
1
रॉक  क्लाइंबिंग
2
पॅरासेलिंग
3
स्कुबा डायव्हिंग
4
ट्रेकिंग
5
रायफल शूटिंग
6
सायकलिंग
7
पर्वतारोहण
8
अश्वारोहण
9
वनविहार
10
बँड
11
गटांतर्गत (Inter House) कवायत,शिस्त  स्पर्धा
12
नौदल , वायुदल, भूदल दिन साजरीकरण
13
राष्ट्रीय ध्वजा दिन
14
कॅम्प फायर
15
स्वतंत्र सेनानी दिन आयोजन
16
कराटे प्रात्यक्षिक
17
NSS कॅम्प
18
NCC कॅम्प
19
मिलिटरी कॅम्प ट्रेनिंग

 

      
   
       
सहशालेय उपक्रमांची यादी संग्रही ठेवण्याचा  नोंद नमुना Download करण्यासाठी खालिल link ला Click करा.