किशोर मासिक
पंडित
जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी १४ नोव्हेंबर १९७१ रोजी ८ ते १४ वर्षे वयोगटातील
मुलांसाठी ’किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले. मुलांमध्ये
अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी,
अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान
मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार
व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या ४५ वर्षांत किशोर
मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत.
अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे.
त्या
काळात दहा ते पंधरा वयोगटातल्या मुलांचं मनोरंजन करेल असं मासिक उपलब्ध नव्हतं.
मुलांसाठीची महत्त्वाची नियतकालिकं काळाच्या पडद्याआड लुप्त झाली होती.
पाठ्यपुस्तकांइतकंच विद्यार्थ्यांना पूरक वाचन साहित्य देणं गरजेचं होतं. पूरक
वाचनासाठी पुस्तकं प्रसिद्ध करण्यात अनेक मर्यादा होत्या. मासिकाद्वारे हा उद्देश
साध्य करणं शक्य होतं. त्यातून ‘किशोर’ची निर्मिती झाली.
नोव्हेंबर
१९७१ मध्ये पंडित नेहरूंच्या जन्मदिनी ‘किशोर’चा पहिला अंक प्रकाशित झाला.
मुखपृष्ठावरचं नेहरूंचं चित्र काढलं होतं प्रसिद्ध चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी.
“तुमच्या बुद्धीला, तरल अशा कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला सतत काहीतरी हवे
असते. काही अद्भूतरम्य विलक्षण असे पहावे,
ऐकावे याकडे तुमचे मन सारखे
झेपावते. या तुमच्या सर्वांगाने, सर्वांशाने फुलण्याच्या काळात तुम्हांला काही
मदत करता आल्यास ती करण्याचा ‘किशोर’चा विचार आहे,”
असं तत्कालीन शिक्षण मंत्री
मधुकरराव चौधरी यांनी आपल्या मनोगतात म्हटलं होतं. पहिल्या अंकाच्या प्रती
शाळांमध्ये मोफत वाटण्यात आल्या आणि विद्यार्थी-शिक्षकांची प्रतिक्रिया अजमावण्यात
आली. ‘किशोर’ची नियमित छपाई जानेवारी १९७२ पासून सुरू झाली. पहिल्यांदा दहा हजार
प्रती छापण्यात आल्या. सहा महिन्यांनंतर ‘किशोर’ची विक्री दरमहा २५ ते ३० हजार
प्रती आणि दिवाळी अंकाची विक्री ३५ ते ४० हजार प्रतींपर्यंत गेली. आता दरमहा
सरासरी ६५ हजार प्रती वितरित होतात.
‘किशोर’ला कलात्मक मांडणी आणि आशय संपन्नतेचं
अधिष्ठान दिलं ते पहिले कार्यकारी संपादक वसंत शिरवाडकरांनी. ‘किशोर’नं कटाक्षानं
काही पथ्यं पाळली. विद्यार्थी वाचकांमध्ये सम्यक,
विवेकी, तर्कशुद्ध, विज्ञाननिष्ठ
विचार-दृष्टिकोन रुजावा; त्यांच्या मनात धार्मिक, जातीय, आर्थिक, लैंगिक
भेदाभेदाच्या विचारांचा प्रभाव पडू नये,
यासाठी काळजी घेण्याचं धोरण
‘किशोर’नं स्वीकारलं. अंधश्रद्धांना खतपाणी घालणारं,
जुन्या रूढी परंपरा, कर्मकांडांना
प्रोत्साहन देणारं लिखाण मासिकात नसेल असं पथ्यही मंडळानं घालून घेतलं. विज्ञान, तंत्रज्ञान, भूगोल, सामाजिक
इतिहास यासारख्या विषयांना विशिष्ट पानं राखीव ठेवण्यात आली. या विषयावरचं लेखन
सोपं-सुटसुटीत असेल याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी होमी भाभा सायन्स एज्युकेशन
सेंटरची मदत घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारं
‘शंका-समाधान’ हे सदर, शिरवाडकर यांची ‘असे हे विलक्षण जग!’ ही लेखमाला
खूप गाजली. गोष्टी, कवितांसोबत रंगीत चित्रं,
रेखाटनं वापरण्याची प्रथा
‘किशोर’नं पहिल्या अंकापासून पाडली.
किशोरनं दिग्गज
चित्रकारांकडून चित्रं काढून घेतली तसंच सामाजिक भान ठेवून कला महाविद्यालयांतून
बाहेर पडणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांनाही संधी दिली. त्यामुळे ‘किशोर’मधील चित्रं
ताजीतवानी राहिली. तरुण कलाकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या वेगवेगळ्या
शैलीतल्या चित्रांनी मुखपृष्ठं सजली.
‘किशोर’ वाचकाभिमुख व्हावा म्हणून विद्यार्थ्यांच्या
प्रतिक्रिया घेतल्या जातात. मुलांना गोष्टी,
चित्रं, कोडी, विनोद
असं हलकंफुलकं, चटपटीत वाचन हवं असतं. त्यानुसार बदल करण्यात येतात.
विद्यार्थ्यांनी लिहितं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी साहित्याचा आणि चित्रांचा
विभाग सुरू केला. विद्यार्थ्यांमधून लेखक घडावेत म्हणून ‘किशोर’नं महाराष्ट्राच्या
कानाकोपऱ्यात, वाड्यावस्त्यांवर,
साखर शाळांमध्ये, दगडखाण
कामगारांच्या मुलांच्या शाळांमध्ये,
आदिवासी पाड्यांत लेखन
कार्यशाळा घेतल्या. कविता, कथा,
लेख कसे लिहावेत याचं
मार्गदर्शन वसंत बापट, यदुनाथ थत्ते,
महावीर जोंधळे, माधव
वझे, अनिल तांबे,
बाळ सोनटक्के, विजया
वाड, प्रवीण दवणे आदींनी केलं. सर्वोत्तम ते देण्याची धडपड
मासिकात प्रतिबिंबित होत असल्यानं ‘किशोर’ विविध व्यासपीठांवर नावाजला गेला. तीन
अंकांना राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संघाची बक्षीसं मिळाली. माहिती
आणि प्रसारण मंत्रालयानं मार्च १९७३ आणि नोव्हेंबर १९७६ च्या अंकांना छपाई आणि
सजावटीसाठी अनुक्रमे श्रेष्ठता प्रमाणपत्र आणि प्रथम पुरस्कार देऊन गौरवलं. ही
परंपरा आजतागायत कायम आहे. मागील २०१६ दिवाळी अंकालाही महाराष्ट्र साहित्य
परिषदेचे जानकीबाई केळकर उत्कृष्ट बाल वाड्मयाचे पारितोषिक मिळाले. आजपर्यंत
मासिकाला वेगवेगळी ४५ पारितोषिकं मिळाली आहेत.
‘किशोर’चं वितरण ‘बालभारती’चं करते. शाळा आणि देणगीदारांना
पोस्टामार्फत सवलतीच्या दरात अंक वितरित केला जातो. सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा
सुरू झाल्यापासून ‘किशोर’मध्ये चार इंग्रजी पानं देण्यात येतात.
किशोर हे मासिक
प्रत्येक शाळेत व विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे. यासाठी आपण खालीलप्रमाणे ते मागवू
शकता
किंवा
बालभारती च्या संकेतस्थळा
वरून PDF मध्ये मोफत Download करू शकता
अंक घरपोच मागवा
वार्षिक वर्गणीची
रक्कम रु. ८०/- मनीऑर्डर अथवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या पुणे शाखेवरील
डीमांड ड्राफ्टद्वारे संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ,
या नावाने खाली नमूद केलेल्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर पाठवावी.
धनादेश स्वीकारला जाणार नाही.
पत्रव्यवहाराचा पत्ता
कार्यकारी संपादक, किशोर,
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
सेनापती बापट मार्ग, पुणे - ४११००४
संपादकीय: ०२० - २५७१६१०७
वितरण व तक्रार: ०२० - २५७१६२४४
फॅक्स - २५६५६०४६
ई-मेल: kishoremagazine@gmail.com
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
सेनापती बापट मार्ग, पुणे - ४११००४
संपादकीय: ०२० - २५७१६१०७
वितरण व तक्रार: ०२० - २५७१६२४४
फॅक्स - २५६५६०४६
ई-मेल: kishoremagazine@gmail.com
2 comments:
नमस्कार मी संतोष सोनटक्के असून मी आपला ब्लॉग पाहिला आहे. त्या ब्लॉगवरील मजकूर खूप उपयुक्त आहे.
मी सुद्धा आपल्या प्रमाणे एक प्राथमिक शिक्षक असून मी स्वतः वेबसाईट व मोबाईल एप्लीकेशन आणि डिझाईन आणि डेवलपमेंट HTML,CSS, PHP, JAVASCRIPT, JQUERY, ANGULAR5 , IONIC 3 इत्यादी कंप्यूटर प्रोग्रामिंग चा वापर करतो.
सध्या जिल्हा परिषद शाळेतील बरेच शिक्षक ब्लॉग चा वापर करून इतर शिक्षकांना उपयुक्त माहिती पुरवत असतात. पण तयार केलेले हे ब्लॉग गुगलमध्ये सर्च व्यवस्थित करत नाहीत. त्यामुळे बरीच उपयुक्त माहिती इतर शिक्षकांना मिळत नाही.
म्हणून मी असे ठरवले आहे की महाराष्ट्रातील शिक्षकांचे सर्व ब्लॉग चे रूपांतर वेबसाईट मध्ये करावे. याकरिता मी सर्व शिक्षकांना वेबसाईट तयार करण्याकरिता मदत करणार आहे. त्यासाठी मी माझ्या जवळ असलेले Web Hosting Server वरील space अगदी मोफत देणार आहे. जेणेकरून आपणास काहीही खर्च न करता आपली वेबसाईट माझ्या वेब सर्वर वर आपण टाकू शकता.
याकरिता आपणास काहीही खर्च येणार नाही सगळं अगदी मोफत आहे. मी आपणास 1 GB Disk Space, 2 Email Account, 1 Domain ,50GB Monthly Bandwidth, 2 MySql Database अगदी मोफत देणार आहे. जेणेकरून महाराष्ट्रातले सर्व शिक्षक बंधू ब्लॉग वरून वेबसाईट वर येतील.
त्याकरिता मी अगदी मोफत मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. आपणास डोमेन नेम https://www.freenom.com
या वेबसाइटवरून अगदी मोफत घेता येते , जेणेकरून आपल्या वेबसाइटला नाव व्यवसायिक रित्या देता येते उदाहरणार्थ www.zpteacher.tk .
आपणास डोमेन नेम व Web Space दोन्हीही मोफत मिळाल्यामुळे आपली वेबसाईट अगदी सुंदर व व्यवसायिक दिसेल जेणेकरून इतरांना सुद्धा आपल्या वेबसाईटवर भेट देऊन उपयुक्त माहिती वारंवार वाचावी वाटेल आपली वेबसाईट चांगल्या रीतीने सर्च होईल व त्यामुळे वाचणाऱ्यांची संख्या वाढेल.
आपणास Microsft Word, Excel येत असेल तर आपण आपली वेबसाईट wordpress मध्ये बनवू शकता याकरिता आपणास कोणत्याही कॉम्प्युटर Programming व Coding आवश्यकता नाही. आपण आपली वेबसाईट अगदी सहजपणे फक्त माऊस क्लिक द्वारे बनू शकता. वर्डप्रेस वरील बरीच व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध आहेत. आपण व्हिडिओ बघून सहजरीत्या सुंदर अशी वेबसाइट बनवू शकतो.
तसेच आपण आपल्या वेबसाईटला गुगलचे गूगल ऍडसेंन्स चे जाहिराती लावून युट्युब पेक्षा अधिक ऑनलाइन अर्निंग करू शकता.
मी आपणास संपूर्णपणे मोफत मार्गदर्शन करणार आहे. तरी आपण इच्छुक असाल तर मला खालील फोन नंबर वर संपर्क करू शकता किंवा ईमेलद्वारे सुद्धा संपर्क करू शकतात
धन्यवाद
मोबाईल नंबर : 8421333417
ईमेल : santu.ghau@gmail.com
संतोष सोनटक्के
नांदेड
hy nice article
thanks for is great information about the topic its realy helpful for me
thanks for sharing this great insights.
I have also posted some valuable information about Sarkari Exam Results. Do read it.
Now i am following your blog information .
Post a Comment