Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

लहान कुटुंबासंबंधी घ्यावयाचे प्रतिज्ञापत्र

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 28 मार्च 2005 रोजी शासन आदेश काढण्यात आला, त्यानूसार राज्यातील लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या उमेदवारांना शासन सेवेत नियुक्ती देण्यास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र) नियम 2005 हा नियम दिनांक 28 मार्च 2005 पासून अमलात आणण्याचे आदेशित करण्यात आले आहे. या संदर्भीय याअगोदरच 28 एप्रिल 2005 ला परिपत्रक शासनाने पारित केलेले आहे.


या अधिसूचनेनुसार शासन सेवेमध्ये गट अ ते ड मध्ये सरळ सेवेने करण्यात येणाऱ्या नियुक्त्यांना लहान कुटुंबाचे अट लागू करण्यात आलेली आहे.
या आदेशान्वये पद नियुक्तीच्या जाहिराती मध्येच पात्र उमेदवार हा लहान कुटुंब असल्याचा उल्लेख करावा व नियुक्ती वेळी तसे प्रपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
28 मार्च 2005 रोजी चा शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.


लहान कुटुंबासंबंधी घ्यावयाचे प्रतिज्ञापत्र नमुना अ
महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील प्रतिज्ञापत्राचा नमुना पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

No comments: