Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

शाळा विकास आराखडा School Development Plan

शाळा विकास आराखडा  School Development Plan म्हणजे काय? शाळा विकास आराखडा व शालेय व्यस्थापन समिती यांचा संबंध काय आहे. शालेय विकास आराखडा कसा तयार करावा? इत्यादी सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण ही शब्द बांधणी करत आहोत.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९  RTE 2009, मधील कलम २२ (१) नुसार शाळा व्यस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार करावा. संबंधित केंद्रप्रमुख / समन्वयक यांनी आराखड्याचे मूल्यमापन करावे. हा आराखडा स्थानिक प्राधिकरणाला (ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा कटक मंडळ) तत्काळ सादर करावयाचा आहे.


शाळा विकास आराखडा चे आधार क्षेत्र:

शाळा विकास आराखडा हा पुढील चार क्षेत्रांवर आधारित राहील.
१. शाळा सुविधा 
२. समता 
३. गुणवत्ता
४. लोकसहभाग

शाळा विकास आराखड्याचा उद्देश:

१. कृती आराखडा या माध्यमातून शालेय व्यस्थापन समिती चे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व ग्रामस्थ यांच्या सहभागातून शाळेच्या गरजा, बलस्थाने व उणीवा यांचा शोध घेवून कृती आराखडा तयार करणे .  
२. शाळा विकास आराखडा हा समूह आराखडा, गट / मनपा आराखडा, जिल्हा/राज्य वार्षिक कार्ययोजना व अंदाजप्रत्रक निर्मितीचा पाया आहे. म्हणून शाळा विकास आराखड्यातील आकडेवारी अचूक असावी.
३. उपरोक्त नमूद आधारक्षेत्रांमध्ये समन्वयक प्रस्थापित करून शालेय व्यस्थापन समितीच्या माध्यमातून शालेय विकास लोकसहभागाच्या माध्यमातून करवणे.
४. शाळेसमोर येणारी नवनवीन आवाहने स्थानिकांच्या मदतीने सोडविणे.

त्यामुळे प्रस्ताविकाच्या शेवटी शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सचिव यांची स्वाक्षरी असावी असे नमूद आहे.




Sr. No
Description
Link
शाळा विकास आराखडा सन २०१६-१७
शाळा विकास आराखडा सन २०१७-१८
शाळा विकास आराखडा सन २०१८-१९




        

शालेय तक्रार पेटी

शाळेमध्ये तक्रार पेटीची (School Complaint Box) आवश्यकता का आहे? काय शाळेमधील तक्रारपेटी ची रचना कशी असावी? उद्देश व शालेय तक्रार पेटीवर कार्यवाही काय करावी? शालेय तक्रार पेटीची नोंदवही कशी असावी? या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा हा एक प्रयत्न:

शालेय तक्रार पेटी:
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक 5 मे 2017 रोजी एक परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी आदेशित करण्यात आले आहे.
शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये तक्रार पेठी बसवण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे या परिपत्रकामध्ये नमूद करत करत, काही शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याची कार्यवाही झाली आहे तथापि राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याची कार्यवाही होणे आवश्यक आहे व ही आवश्यक ती कार्यवाही पुढील प्रमाणे असण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत.

शाळा व्यवस्थापनाने किंवा शाळा प्रशासनाने करावयाची कार्यवाही:
प्रत्येक प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागात किंवा प्रवेशद्वारानजीक संबंधीतांच्या नजरेत येईल अशा रितीने लावण्यात यावी.
तक्रार पेटी पुरेशा मापाची व सुरक्षित असावी त्यावर तक्रार पेटी असा उल्लेख असावा.

तक्रार पेटी प्रत्येक आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात यावी तक्रार तक्रार पेटी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात यावी. ज्या शाळेस पोलीस पाटील उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पोलीस पाटील मदत तक्रार पेटी  उघडताना उपलब्ध करून घेण्यात यावी. मात्र ज्या ठिकाणी पोलीस पाटील किंवा पोलीस प्रतिनिधी यांच्या सेवा उपलब्ध करणे प्रत्यक्ष शक्य नाही अशा ठिकाणी प्रत्येक वेळी तक्रार पेटी उघडताना पोलीस प्रतिनिधी उपस्थित असण्याबाबत आग्रह धरण्यात येऊ नये. अशा परिस्थितीत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य, पालक प्रतिनिधी किंवा विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष तक्रार पेटी उघडण्यात यावी.
गंभीर किंवा संवेदनशील स्वरूपात तक्रारींबाबत पोलीस यंत्रणेचे सहाय्यक आवश्यक असल्यास तात्काळ घेण्यात यावे.
तक्रारपेटीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्यासाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही किंवा उपाययोजना करण्यात यावी. ज्या तक्रारी शाळा व्यवस्थापन किंवा प्रशासन स्तरावर निकाली काढणे शक्‍य आहे त्याबाबत तात्काळ शाळा व्यवस्थापन स्तरावर कार्यवाही करावी. ज्या तक्रारींसंदर्भात क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर किंवा शासन स्तरावर कार्यवाही किंवा मार्गदर्शन अपेक्षित असेल तेथे योग्य त्या स्तरावर तक्रारीच्या प्रतिसह संदर्भ करण्यात यावा.
तक्रारकर्त्याचे नाव गुप्त राहील व तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना कोणताही त्रास होणार नाही याबाबतची योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
संबंधित शाळेतील महिला शिक्षक किंवा विद्यार्थिनी यांच्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समिती / विशाखा समिती समोर ठेवण्यात याव्यात. तसेच शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थिनीवर अत्याचारा बाबतच्या तक्रारी शाळा व्यवस्थापन समिती समोर ठेवण्यात याव्यात महिला तक्रार निवारण समिती किंवा शाळा व्यवस्थापन समितीने या विषयाची तक्रार सर्वात प्रथम विचारात घेऊन त्याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत. समितीचे निर्देश किंवा निर्णय शाळा प्रशासनासमोर योग्य त्या कार्यवाहीसाठी ठेवण्यात यावेत.

क्षेत्रीय यंत्रणेची परिवेक्षक जवाबदारी:
या परिपत्रकातील निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही होण्याबाबत पर्यवेक्षकीय नियंत्रण आयुक्त (शिक्षण) यांचे राहील.

शिक्षण संचालक (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी राज्यातील, सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत कार्यवाहीचा आढावा घेऊन सर्व विभागीय शिक्षण संचालकांना त्यांच्याकडील एकत्रित माहिती प्राप्त करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्याच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन शिक्षण अधिकारी यांच्याकडून माहिती प्राप्त करून विभागीय स्तरावरील माहिती शिक्षक संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना तसेच शासनाला सादर करावा.

शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक यांनी संबंधित जिल्ह्यातील, शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याची कार्यवाही बाबत शाळांमध्ये सातत्याने पाठपुरावा करावा आणि त्या जिल्ह्यातील एकत्रित माहिती, संबंधित विभागाचे शिक्षण संचालक यांना सादर करावी.

१. शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक २. विभागीय शिक्षण संचालक व ३. शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी बाबत योग्य ती कार्यवाही करून तक्रार निवारण करणे आवश्यक राहील.
वरील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

त्या अनुषंगाने प्रत्येक शाळेमध्ये तक्रारपेटी बसविणे, प्राप्त झालेल्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करणे, समस्या गंभीर होण्याअगोदर  दखल घेऊन सोडविणे अत्यंत गरजेचे आहे.

शाळेमध्ये तक्रारपेटी बसविल्यानंतर त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारी किंवा सूचनांवर कार्यवाही करण्यासाठी खालील नमुना किंव्हा नोंदनमुना कार्यावाहीसाठी मदतगार ठरू शकतो. या नमुन्यानुसार प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद ठेवून त्यावर होणारी कार्यवाही व परिणाम यांची नोंद ठेवणे आवश्यक आहे.  यावर शाळा प्रमुखाचे म्हणजे प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांचे संनियंत्रण असणे आवश्यक आहे.

वरील नोंद वही नमुना Pdf मिळवण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा:
तक्रारपेटी बाबतीतचा शासन निर्णय पाहण्यासाठी क्लीक करा 


दहा नैतिक मूल्य

नैतिक मुल्ये:-
प्रस्तावना:
आदिम कालखंडापासून मानवी उत्क्रांतीवादाचा अभ्यास केला असता आपल्या निदर्शनास येईल की, आदिम काळात मानव मूलभूत गरजा भागवत जगत होता. या गरजा भागवत असताना त्याने त्याच्याकडे असलेल्या बुद्धीचा व कौशल्यांचा वापर करून निसर्गावर मात करत इतर प्राण्यांचा व नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून विकास साधून घेतला. कालांतराने याच मानवाने या सर्व गोष्टींचा वापर करून विकासाबरोबर संस्कृती, शिष्टाचार, शिक्षण, तत्त्वज्ञान, जीवनमूल्य सारख्या संकल्पना साकार करायला सुरुवात केली व त्यातूनच माणूस हा सुसंस्कृत बनला. यावेळी शिक्षण इतिहासात ज्ञान व प्रगती हा शिक्षणाचा प्रमुख पैलू असल्याचे दिसून येईल.


पृथ्वीवरील प्रत्येक साधन सामग्रीचा वापर करून आधुनिकतेची कास धरून चंद्र नव्हे तर मंगळापर्यंत जाऊन पोहोचला. मात्र इकडे माणूसच माणूसपण विसरून गेला व प्रगतीच्या मार्गामध्ये अनैतिकता, व्यभिचार, दुर्वर्तन व परिणामी विध्वंस यासारखे अडसर येताना दिसून यायला लागले. या जगामध्ये मानवाला मानव बनून जगणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे दिसून येऊ लागले.

हल्ली शिक्षणाचा अर्थ केवळ पाठ्यपुस्तक,अभ्यासक्रम, परीक्षा, निकाल, अव्वल नंबर असाच अभिप्रेत झाला आहे. या जगाला स्पर्धेचे जग म्हणून संबोधण्यात येते, मात्र या स्पर्धेच्या जगामध्ये ‘स्पर्धेची परीक्षा’ का ‘परीक्षेची स्पर्धा’ याचाच अर्थ स्पष्ट होत नाही. त्यामुळे केवळ स्पर्धा गुण व अव्वल क्रमांक म्हणजे शिक्षण न होता मानवतावाद याचा सर्वांगीण विकास करणे हे सर्वात मोठे आव्हान शिक्षण व्यवस्थेवर आहे. उदाहरण म्हणून द्यायचे झाले तर या स्पर्धा युक्त शिक्षणाच्या माध्यमातून एक मुलगा डॉक्टर झाला. तो डॉक्टर झाला खरा पण त्यामध्ये मूल्य व तत्त्वांची अभिरुची झालीच नाही. त्याने आपल्या ज्ञानाच्या साह्याने एक अगतिकच शोध लावला, एखाद्या पेशंटवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला भूल दिली जाते, म्हणजे त्याचे शरीर बेशुद्ध केले जाते. या भुलीचा वापर स्वतःवर करून नशा तो करू लागला व एक दिवस त्यातूनच त्याचा मृत्यू झाला. तात्पर्य - तत्व किंव्हा मुल्यांशिवाय व्यक्ती केवळ शरीराने वा पदवीनेच डॉक्टर राहील.

शिक्षण प्रक्रियेमध्ये आधुनिकता, विकास, प्रगतीचे व ज्ञानाचे धडे देण्यापेक्षा मानवतेचे, तत्वज्ञानाचे व मूल्यांचे धडे देणे गरजेचे वाटू लागले आहे. त्यातूनच मुल्यशिक्षणाची गरज शालेय अभ्यासक्रमामध्ये प्रत्ययाने जाणवू लागली. त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये दहा नैतिक मूल्यांची अभिरुची घडवून आणणे गरजेचे आहे.

नैतिक मूल्य म्हणजे काय?:-
व्यक्तींमध्ये ज्ञानाबरोबर शील, चारित्र्य, संस्कार याची रुजवणूक करणे याला नैतिक मूल्य अभिरुची असे आपण म्हणू शकतो.
ज्ञान आणि तत्व किंवा मूल्य या बाबतीत एक विसंगती आढळून येईल. ज्ञान मिळवता येते ते देता वा घेताही येते. मात्र मूल्य ही अंगीकारावीच लागतात व त्यांची रुजवणूक करणे अत्यंत गरजेचे असते. ज्ञान कोणत्याही वयात मिळवता येते मात्र वेळ निघून गेला असता मूल्यांचे पारायण करूनही काहीही उपयोग होनार नाही. या तत्त्वांची अभिरुची रुजवणूक करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षण विभागाला करावे लागणार आहे यामधूनच खऱ्या अर्थाने माणूस हा माणूस म्हणून जगेल……..


दहा नैतिक मूल्य

वक्तशीरपणा
नीटनेटकेपणा
श्रमप्रतिष्ठा
सौजन्यशीलता
सर्वधर्मसहिष्णुता
राष्ट्रभक्ती
संवेदनशीलता
वैज्ञानिक दृष्टिकोन
राष्ट्रीय एकात्मता
स्त्री-पुरुष समानता





शिक्षण संक्रमण ऑक्टोबर २०१८

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या “शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत  Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.


शिक्षण संक्रमण ऑक्टोबर २०१८

शिक्षण संक्रमण  ऑक्टोबर २०१८     

शिक्षण संक्रमण सप्टेंबर २०१८


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या “शिक्षण संक्रमण” या मासिकाची PDF प्रत मंडळ त्यांच्या संकेतस्थळा वर विनामूल्य उपलब्ध करून देत असते. ही प्रत  Download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.


शिक्षण संक्रमण सप्टेंबर २०१८

शिक्षण संक्रमण  सप्टेंबर २०१८