Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

कलचाचणी 2018 अपडेट्स



कलचाचणी 2018


•‘कल चाचणी’ बाबतच्या सर्व सूचना या संकेत स्थळावर आपल्या login मध्ये पाहता येतील. 
•विद्यार्थी कलचाचणी देण्या करिता संगणक प्रयोगशाळे मध्ये आल्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याची उपस्थिती पत्रकात स्वाक्षरी घ्यावी. 
•प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षेच्या गुण पत्रका बरोबर विद्यार्थ्याची उपस्थिती पत्रके विभागीय मंडळाच्या कार्यालयात सादर करावीत.
•विद्यार्थाने ‘कलचाचणी’ दिल्या नंतर प्रत्यक संगणकाच्या डेस्कटॉप वर एक KALCHACHNI2018 फोल्डर तयार होईल व त्या मध्ये SSC बैठक क्रमांक ची फाईल तयार होयील.
•शिक्षकांनी प्रत्येक दिवशी सर्व संगणकावरील फाईलस एकत्र कराव्यात व सुरक्षित ठेवाव्यात. शाळे मधील संगणकावर DEEPFREEZE सारखी संगणक प्रणाली असल्यास संगणक बंद करण्या पूर्वी फाईलस एकत्र कराव्यात व सुरक्षित ठेवाव्यात.
•सर्व विद्यार्थाची ‘कलचाचणी’ पूर्ण झाल्या नंतर या सर्व फाइल्स झिप करून अपलोड करावयाच्या आहेत.
• शिक्षकांनी सर्व फाईलसचा BACKUP स्वतःकडेही ठेवायचा आहे.
•अपलोड बाबत च्या सूचना संकेतस्थळावर देण्यात येतील.
•फाईल अपलोड केल्या नंतर आपणास प्रमाणपत्र देण्यात येईल. ते विभागीय मंडळात जमा करावे.

कलचाचणी २०१८ च्या संकेतस्थळाला जाण्यासाठी खालील बटनावर क्लीक करा ----->  





शिक्षक पालक सभा


शिक्षक पालक सभा समिती
( पालक शिक्षक सभा समिती )
Parents Teacher Committee


राज्यातील प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या भौतिक, शैक्षणिक विद्यार्थी विकासाच्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शालेय कामकाजामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग सहयोग वाढवण्यासाठी दिनांक 16 मे 1996 च्या शासन निर्णयान्वये प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने माध्यमिक शाळा संहितेतील नियम क्रमांक 3.2 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.

त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील प्रत्येक खाजगी विनाअनुदानित शाळेतही पालक-शिक्षक सभा स्थापने  संदर्भात निर्णय देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक 24 ऑगस्ट 2010 रोजी शासन निर्णय पारित करण्यात आला या शासन निर्णयामध्ये पालक-शिक्षक संघाचे मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली.

पालक-शिक्षक सभेची  मार्गदर्शक तत्त्वे:

.  शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक  पालक-शिक्षक संघाचे सभासद असतील.  
. पालक-शिक्षक संघाच्या मूळ उद्देश विद्यार्थी शिक्षकांच्या समस्या सोडविणे हा आहे.  पालक शिक्षक संघाने शाळेचा दैनंदिन कामकाजात  प्रशासनात लक्ष्य घालने अपेक्षित नाही.  
. प्रत्येक शाळेत पालक शिक्षक सभेची स्थापना करणे अनिवार्य आहे.
. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून तीस  दिवसाच्या आत पालक शिक्षक संघाची स्थापना करणे प्रत्येक शैक्षणिक संस्थेला बंधनकारक असेल.

पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारिणी समितीची रचना:

. अध्यक्ष                                    प्राचार्य / मुख्याध्यापक
. उपाध्यक्ष                                 पालकांमधून एक
. सचिव                                     शिक्षकांमधून एक
. सहसचिव ()             पालकांमधून शिक्षकांमधून
. सदस्य                      प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक
प्रत्येक तुकडीसाठी एक पालक
(जेवढ्या तुकडे असतील तेवढे पालक)

  • कार्यकारणी समितीमध्ये 50 टक्के महिला असणे अनिवार्य असेल.
  • ही कार्यकारिणी सदस्यांच्या नावाची यादी शाळेच्या सूचनाफलकावर तसेच संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.
  • पालक शिक्षक संघाची स्थापना केल्यानंतर 15 दिवसाच्या आत सदस्यांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात यावी.

पालक शिक्षक संघाची कर्तव्य किंवा कार्य :

.  नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण होईल हे पाहणे .
.  अभ्यासक्रमात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना सुचवणे.  
.  अभ्यासक्रमाशी  पूरक असलेल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी शाळांना साह्य करणे.  
. सहशालेय उपक्रमांना मान्यता देणे.  
. शाळेतील शैक्षणिक शुल्क, सत्र फी   सहशालेय उपक्रमांसाठी आकारण्यात येणारे  शुल्क संबंधीची माहिती घेऊन पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारणी समितीपुढे त्यांचे म्हणणे मांडणे.







हे परिपत्रक PDF  स्वरूपात Download  करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा . 

कलचाचणी 2018

कलचाचणी २०१८

मार्च २०१८ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रथम प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्याची‘कल चाचणी’ दि. १० फेब्रुवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात येईल.
कलचाचणी च्या कामा करिता प्रत्येक शाळे मध्ये शालाप्रमुखानी एका शिक्षकास नियुक्त करावे.विद्यार्थाचे गट वार नियोजन करण्याचे काम शाळांनी ‘कलचाचणी’ करिता नियुक्त केलेल्या शिक्षकां मार्फत करावयाचे आहे.
‘कलचाचणी’ करिता ४० मिनिटे कालावधी ठरविला आहे. एका दिवसात एका संगणकावर ६ वेळा ‘कलचाचणी’ घेण्यात यावी. त्या प्रमाणे विद्यार्थाचे गट वार नियोजन करावे.
‘कलचाचणी’ मध्ये १४० विधाने आहेत. सर्व विधानांना प्रतिसाद देणे अनिवार्य आहे.
सर्वसाधारणपणे ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण करतो त्यातील कोणत्या गोष्टी तुम्हाला प्राधान्याने आवडतात हे समजून घेणे हा या कलचाचणीचा उद्देश आहे. आपण करीत असलेल्या अनेक कृतींची ही एक यादी आहे. त्यापैकी काही कृती तुम्हाला आवडल्या असतील किंवा नसतील, म्हणून प्रत्येक वाक्य वाचून तुमच्या आवडी निवडीनुसार तुम्हाला योग्य वाटत असलेला पर्याय निवडून उत्तर द्या.
एखादी कृती तुम्हाला किती आवडते किंवा नाही यावर आधारीत योग्य पर्याय निवडून उत्तर द्या.
उत्तर देण्यासाठी 'खूप जास्त', 'जास्त ','थोडे ', आणि 'आजिबात नाही' असे पर्याय आहेत.
प्रत्येक पानावर ५ विधाने आहेत. पुढील पानावर जाण्याचे बटन क्लिक करण्यापूर्वी विद्यार्थी त्याचा प्रतिसाद बदलू शकतो.
‘कल चाचणी’ ची जबाबदारी प्रत्येक शाळेतील एक शिक्षका ची आहे. या शिक्षका ची नियुक्ती शालाप्रमुखानी करावी.
या शिक्षकाने स्वत: ची , शाळेची व संगणक सुविधांची माहिती http://kal18.mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर सादर करावी.
‘कल चाचणी’ बाबतच्या सर्व सूचना या संकेत स्थळावर आपल्या login मध्ये पाहता येतील.
विद्यार्थी कलचाचणी देण्या करिता संगणक प्रयोगशाळे मध्ये आल्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याची उपस्थिती पत्रकात स्वाक्षरी घ्यावी.
प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षेच्या गुण पत्रका बरोबर विद्यार्थ्याची उपस्थिती पत्रके विभागीय मंडळाच्या कार्यालयात सादर करावीत.
विद्यार्थाने ‘कलचाचणी’ दिल्या नंतर प्रत्यक संगणकाच्या डेस्कटॉप वर एक फोल्डर तयार होइल व त्या मध्ये SSC बैठक क्रमांक ची फाईल तयार होयील.
शिक्षकांनी प्रत्येक दिवशी सर्व संगणकावरील फाईलस एकत्र कराव्यात व सुरक्षित ठेवाव्यात. शाळे मधील संगणकावर DEEPFREEZE सारखी संगणक प्रणाली असल्यास संगणक बंद करण्या पूर्वी फाईलस एकत्र कराव्यात व सुरक्षित ठेवाव्यात.
सर्व विद्यार्थाची ‘कलचाचणी’ पूर्ण झाल्या नंतर या सर्व फाइल्स झिप करून अपलोड करावयाच्या आहेत.
अपलोड बाबत च्या सूचना संकेतस्थळावर देण्यात येतील.
फाईल अपलोड केल्या नंतर आपणास प्रमाणपत्र देण्यात येईल. ते विभागीय मंडळात जमा करावे.


शासन निर्णय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्यात येईल.या माध्यमातून त्यांना उच्च शिक्षण अथवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य करुन आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येईल. शासन निर्णय

उद्देश : १) इयत्ता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मार्गदर्शन करणे. २) विद्यार्थी व पालक यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची माहिती देऊन जाणीव जागृती करणे.

कलचाचणी वेळापत्रक :कलचाचणी दिनांक १०/०२/२०१८ ते २८/०२/२०१८ या कालावधीत पुर्ण करावयाची आहे.प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त सत्रात चाचणी चे नियोजन शाळांनी करावयाचे आहे.दर दिवशी किमान ६ सत्रांत चाचणी घेणे शक्य आहे.या चाचणी करीता ४० मिनिटे वेळ निर्धारीत केला आहे.विद्यार्थी त्यापेक्षा जास्त वेळ चाचणी साठी घेऊ शकतात.त्यामुळे सुमारे ५० ते ६० मिनिटांचे १ सत्र ठेवावे व नियोजन करावे.

प्रकटन १ दिनांक : २/२/२०१८


कलचाचणी website ला जाण्यासाठी खालील लिंक ला Click करा--

http://kal18.mh-ssc.ac.in/home.aspx

Click Here

कल चाचणी
kal18.mh-ssc.ac.in/home.aspx

सहशालेय उपक्रम यादी

अ.क्र.

सहशालेय उपक्रम

      

नवागतांचे स्वागत/ प्रवेसोत्सव

वैयक्तिक स्वच्छता

जो दिनांक तो पाढा

इंग्रजी वर्तमानपत्र

गृहपाठ तपासणी पथक

वर्ग सजावट

मोठ्यांनी लहानांचा आभ्यास घेणे

शब्दांच्या भेंड्या

टाकावू पासून टिकावू

१०

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

११

बाल आनंद मेळावा

१२

वाढदिवस साजरा करणे

१३

मराठी, हिंदी, इंग्रजी परिपाठ

१४

अनुभव कथन सोहळा

१५

रांगोळी सुशोभन ( फुले, दगड, पाने )

१६

वक्तृत्व स्पर्धा

१७

चित्रकला स्पर्धा

१८

चित्रकला प्रदर्शन

१९

निबंध लेखन

२०

उपस्तिथी सन्मान

२१

बुद्धिबळ स्पर्धा

२२

खेळाद्वारे पाठांतर

२३

प्रश्नोत्तराचा तास

२४

वाचाल तर वाचाल

२५

शैक्षणिक तक्ते

२६

योगासने

२७

लेझीम सादरीकरण

२८

काव्य वाचन

२९

गायन स्पर्धा

३०

बँड पथक

३१

फॅन्सी ड्रेस स्पर्धा

३२

नाट्यीकरण

३३

भेटकार्ड तयार करणे

३४

मातकाम

३५

शंकापेटी

३६

लोकवर्गणीतून शाळेचा विकास

३७

रक्षा बंधन

३८

विज्ञान प्रदर्शन

३९

आरोग्य शिबीर

४०

विशेष व्यक्तींच्या मुलाखती

४१

गावातील व्यावसायिकांना भेट

४२

क्रिडा स्पर्धा

४३

शैक्षणिक सहली ( ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रेक्षणिक, नैसर्गिक )

४४

क्षेत्र भेट ( ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रेक्षणिक, नैसर्गिक, भावनिक, व्यावहारिक ठिकाणी )

४५

स्वच्छता मोहीम

४६

हळदी कुंकू

४७

आदर्श माता पुरस्कार

४८

स्नेह संमेलन

४९

वृक्षारोपण

५०

प्रश्न मंजुषा

५१

महिला मेळावा

५२

क्षेत्र भेट

५३

श्रम संस्कार शिबीर

५४

सहभोजन

५५

लोकजागृती रॅली

५६

सांस्कृतिक पारितोषिक वितरण समारंभ

५७

अंधश्रद्धा निर्मुलन जनजागरण उपक्रम

५८

पथनाट्य

५९

विविध जयंती व पुण्यतिथी

६०

संगणक साक्षरता

६१

वाद विवाद स्पर्धा

६२

एकांकिका

६३

गणित प्रश्न मंजुषा

६४

पोस्ट ऑफिस भेट

६५

जैव तंत्रज्ञान  विभागास भेट

६६

असमानता निर्मुलन कार्यक्रम

६७

वयस्कांकडून मार्गदर्शन

६८

आपत्ती व्यस्थापन प्रात्यक्षिक

६९

आपत्ती व्यस्थापन मार्गदर्शन

७०

संविधान वाचन दिन

७१

वाचन प्रेरणा दिन

७२

युवा दिन आयोजन

७३

कथा कथन

७४

प्राणी संग्रहालयास भेट

७५

विषयनिहाय कार्यशाळा

७६

संस्कारक्षम व्याख्याने

७७

कॅम्प फायर

७८

रस्ता सुरक्षा सप्ताह

७९

रस्ता सुरक्ष मार्गदर्शनपर व्याख्यान

८०

व्यसन मुक्ती समुपदेशन

८१

लैगिकशिक्षण समुपदेशन

८२

भित्तीपत्रके

८३

समूहगान स्पर्धा

८४

आनंद नगरी

८५

मीना राजू मंच

८६

स्नेह भोजन

८७

हस्तकला  कार्यशाळा

८८

भाषण स्पर्धा

८९

असंबंद भाषण स्पर्धा

  

सैनिकी शाळेसाठी  :                               

1

रॉक  क्लाइंबिंग

2

पॅरासेलिंग

3

स्कुबा डायव्हिंग

4

ट्रेकिंग

5

रायफल शूटिंग

6

सायकलिंग

7

पर्वतारोहण

8

अश्वारोहण

9

वनविहार

10

बँड

11

गटांतर्गत (Inter House) कवायत,शिस्त  स्पर्धा

12

नौदल , वायुदल, भूदल दिन साजरीकरण

13

राष्ट्रीय ध्वजा दिन

14

कॅम्प फायर

15

स्वतंत्र सेनानी दिन आयोजन

16

कराटे प्रात्यक्षिक

17

NSS कॅम्प

18

NCC कॅम्प

19

मिलिटरी कॅम्प ट्रेनिंग