शालेय परिवहन समिती
School Transport Committee
शालेय परिवहन समिती
महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेमध्ये शालेय विद्यार्थी परिवहन हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. परिवहन व्यवस्थेला शिस्त व दिशा प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व परिवहन विभागाने काही नियमावली निश्चित करून महाराष्ट्रातील सर्व शालेय परिवहना साठी लागू करण्याचा निर्णय घेतला. शालेय परिवहन समिती जिल्हा स्तर, महानगरपालिका स्तर व शालेय स्तरावर गठीत करण्याचा निर्णय याच परिपत्रकान्वये घेण्यात आला. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता व सुरक्षित वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी शाळेत परिवहन समिती असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या समिती संघटनाचा चा उद्देश विद्यार्थ्यांची ने-आण सुरक्षित करणे, अवैध वाहतुकीवर आळा बसवणे व वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळणे याबरोबरच शालेय परिवहन समितीकडे खालील कार्य आहेत.
शालेय परिवहन समितीची कार्य
मुलांना समुपदेशन व सुरक्षा जागृती करणे.
शाळेतील मुलांना दररोज सुरक्षितपणे ने - आण करणे.
बस थांबे, परिवहन शुल्क निश्चित करणे.
वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, वय, विमा, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र
वाहन चालवण्याचा परवाना, प्रथमोपचार पेटी इत्यादी बाबी तपासणे व मगच अश्या वाहनास परवानगी ची शिफारस करणे.
या सर्व बाबींवर अतिशय सुक्ष्मनिरिक्षण ठेवण्यासाठी, मार्गदर्शक म्हणून या समितिचे असणे खुप आवश्यक आहे....
शालेय परिवहन समिती रचना
शालेय परिवहन समिती
अध्यक्ष मुख्याध्यापक / प्राचार्य
सदस्य पालक संघाचा प्रतिनिधी
पोलीस विभागाचा प्रतिनिधी
प्रादेशिक परिवहन विभागाचा मोटार वाहन निरीक्षक
शिक्षण निरीक्षक
बस कंत्राटदराचा प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी