Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

गैरहजर विधार्थी पंचनामा



अनुपस्थित विधार्थी पंचनामा


शिक्षण हक्क कायदा २००९  ( RTE 2009 ) च्या कलम ३ नुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे . त्यानुरूप प्रत्येक ५ ते १४ वयवर्ष असलेल्या बालकाला मोफत व सक्तीने वर्ग ८ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी देणे आपले कर्तव्य बनते. एखादा विधार्थी काही कारणास्तव शाळेला गैरहजर राहत असेल तर त्याला शाळेस हजर करणे संबंधित शिक्षकाचे कार्य आहे. त्यासाठी त्याच्या घरी जावून भेट देणे गरजेचे आहे व अश्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणावे अशी तरतूद आहे. काही विद्यार्थ्यांना घरगुती किवां इतर अडचणी असू शकतात अश्या वेळी शाळा व्यस्थापन समितीच्या मदतीने अश्या कारणांवर मात करून त्या विद्यार्थ्याला शाळेत रुजू करावे. म्हणजेच कोणत्याही कारणास्तव विध्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही जवाबदारी संबंधित शाळेची व शिक्षकांची जवाबदारी आहे.

      जर एखादा बालक गृहभेटीत स्थलांतरित दिसला किंव्हा अन्य करणे आढळून आल्यास त्या भेटीदरम्यान पंचनामा करणे आवश्यक आहे. व तशी नोंद ठेवूनच नाव कमी करण्याचा विचार करता येवू शकतो. या ग्रह भेटीसाठी पंचनामा नमुना पुढे दिला आहे.   

सदरील नमुन्याची PDF file download करण्यासाठी खालील लिंक ला Click करा  ----->






No comments: