बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्र बदलत आहे. आभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व मूल्यमापन पद्धती बदलत आहे. शिक्षण संक्रमण या माध्यमातून पाठ्यपुस्तक मंडळ, परीक्षा मंडळ, शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज यांमध्ये आदानप्रदान व समन्वयाचे काम करत आहे. तसेच विविध शिक्षक अध्ययन अध्यापनात प्रयोगशीलता करताना दिसून येतात. शिक्षण संक्रमण हे मासिक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येते. या मासिकामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारे बदल, मूल्यमापन पद्धतीमधील बदल, त्याबरोबर बदलत्या अभ्यासक्रमानुसार बदलत्या अध्यापन पद्धती याविषयीचे मार्गदर्शन केले जाते. शासनामार्फत व बोर्डामार्फत पारित केलेली परिपत्रके सूचना या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केल्या जातात शिक्षणक्षेत्र संदर्भ व्यक्ती व शिक्षक यांचे विविध विषयावरील व अध्यापन वरील लेख या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केले जातात.
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करत असताना शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात त्याबरोबरच प्रयोगशीलता, अनुभव इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरू शकते यासाठी विचारांचे आदान-प्रदान होणे गरजेचे असते व कार्य शिक्षण संक्रमण या माध्यमातून करण्यात येते.
शिक्षण संक्रमण सप्टेंबर २०१९
इतर महिन्याचे शिक्षण संक्रमण मिळवण्यासाठी खालील लिंक ला जावून Download करू शकता.